प्लास्टिकविरोधी कारवाई, २४ व्यावसायिकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:25 IST2020-12-31T04:25:23+5:302020-12-31T04:25:23+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य विभागाने बुधवारी प्लास्टिकविरोधी कारवाईची मोहीम अधिक कडक केली. एकाच दिवसात शहरातील २४ व्यावसायिकांना प्रत्येकी पाच ...

प्लास्टिकविरोधी कारवाई, २४ व्यावसायिकांना दंड
कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य विभागाने बुधवारी प्लास्टिकविरोधी कारवाईची मोहीम अधिक कडक केली. एकाच दिवसात शहरातील २४ व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजार रुपयेप्रमाणे दंड करुन त्यांच्याकडून एक लाख २० हजार रुपयांची रक्कम वसूल केली.
महापालिकेकडून ही कारवाई लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, बाजारगेट, महाद्वार रोड परिसरात करण्यात आली. महालक्ष्मी प्लास्टिक, अनुबांधन प्लास्टिक, साई ट्रेडर्स, स्वयंभू प्लास्टिक, प्रकाश फॉर्म, अजय ट्रेडर्स, जसवंत स्वट्स, अश्यर आय, श्री महालक्ष्मी बेकरी, ज्योती ऑटोमोबाईल, फॅशन तडका, लाईफ स्टाईल, शहाबाज बागवान, महालक्ष्मी साडी सेंटर, स्वरूप प्लास्टिक, राज क्राॅकरी, गेहानी टाॅबेको सेंटर, बजाज कटलरी, इकबाल ट्रेडर्स, श्री हॅण्डलूम, आनंद शू सेंटर, सागर स्वीट्स, माधुरी डेअरी, उमेश बिअर शॉपी यांचा कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे.
ही कारवाई मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, आरोग्य निरीक्षक ऋषिकेश सरनाईक, शिवाजी शिंदे, मनोज लोट, दिलीप पाटणकर, राहुल राजगोळकर, स्वप्नील उलपें, निखील पाडळकर, गीता लखन, महेश भोसले, श्रीराज होळकर व मुकादम यांनी केली.