शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

शेतकरीविरोधी, फसवे सरकार उलथवा - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 05:03 IST

समतेचा संदेश देणाऱ्या राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांची हत्या होते. नरेंद्र दाभोलकरांनाही मारले जाते मात्र, अद्याप त्यांचे हत्यारे का सापडत नाहीत? पोलीस अधिकारी, नगरसेवकालाही मारले जाते.

मुरगूड (जि. कोल्हापूर)  -  समतेचा संदेश देणाऱ्या राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांची हत्या होते. नरेंद्र दाभोलकरांनाही मारले जाते मात्र, अद्याप त्यांचे हत्यारे का सापडत नाहीत? पोलीस अधिकारी, नगरसेवकालाही मारले जाते. संपूर्ण महाराष्ट्रात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे असा हल्लाबोल करीत समाजा-समाजामध्ये जाती-जातीमध्ये भांडणे लावून आपला फायदा करून घेणाºया फसव्या, शेतकरी विरोधी भाजप सरकारला उलथवून टाका, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.मुरगूड (ता. कागल) येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित हल्लाबोल आंदोलनाच्या पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, देशात व राज्यात ‘अच्छे दिन’ आणतो म्हणून सत्तेत आलेल्या या भाजपने काय केले, याचे उत्तर द्यावे. कोणताही प्रश्न उपस्थित केला तर समिती नेमतो, अभ्यास करतो हे मुख्यमंत्री व संबंधित मंत्री यांचे उत्तर ठरलेले आहे.अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातील छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी करून चबुतºयाची उंची वाढविण्याचे काम या सरकारने केले, असा आरोप त्यांनी केला.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे म्हणाले, एक एप्रिल हा नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे, अशा पोस्ट सोशल मीडियावर आल्या. कारण सत्तेत आल्यापासून मोदींनी जनतेला फसवून कायम एप्रिल फूलच केले आहे. सामान्य जनतेला नव्हे तर ‘अच्छे दिना’चा मंत्र जपणाºया मंत्र्यांनाच ‘अच्छे दिन’ आले आहेत.प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, आगामी निवडणुकीत केंद्रात एकटा भाजप किंवा काँग्रेस सत्तेत येऊ शकत नाही. त्यामुळे देशाच्या राजकारणात राष्टÑवादी काँगे्रसची महत्वाची भूमिका असणार आहे. यासाठी शरद पवारांना ताकद देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.हे तर ‘बाई’ला नाचविणारे सरकारआम्हालाही गाय प्रिय आहे त्याबाबत कायदा केला. आम्हाला वाईट नाही वाटले; पण हजारो कुटुंबांचा विचार करून आम्ही ‘डान्स बार बंदी’चा घेतलेला निर्णय या सरकारने उलथवून पुन्हा ‘डान्स बार’ला परवानगी दिली. गायीला वाचविणारे व पुन्हा बाईला नाचविणारे हे सरकार ‘लोकहितवादी’ आहे का, असा टोला अजित पवार यांनी लगावताच जोरदार टाळ्या पडल्या.विधानसभा प्राणिसंग्रहालय आहे का?विधानसभेच्या अधिवेशनामध्ये लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा होण्यापेक्षा उंदीर, मांजर, वाघ आणि सिंहाची चर्चा होते. ही विधानसभा म्हणजे प्राणिसंग्रहालय आहे का, अशी विचारणा करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतही राज्य सरकारला लक्ष्य केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस