शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

कोल्हापूर एअरविंगसाठी पुन्हा आश्वासनाचे उड्डाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आग्रही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:55 IST

अंमलबजावणी हाेणे आवश्यक

कोल्हापूर : कोल्हापुरात गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेली एअरविंग एनसीसी सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून खुद्द केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीच यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, गेल्या अकरा वर्षांपासून चर्चेत असलेले एअरविंग पुन्हा आश्वासनाच्या उड्डाणात अडकणार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोल्हापुरात १९६० पासून एनसीसीचे ग्रुप हेडक्वार्टर सुरु आहे. याठिकाणी २१ हजार कॅडेट आहेत. आर्मीचे ८ व नेव्हीचे १ युनिट कार्यरत आहे. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरच्या माध्यमातून आर्मी व नेव्हीचा अभ्यासक्रम शिकविला जातो. मात्र एअरफोर्सचे प्रशिक्षण उपलब्ध नव्हते. त्यामुळे कोल्हापुरात एअरविंग एनसीसीचे हेडक्वार्टर सुरू व्हावे, यासाठी आमदार सतेज पाटील, माजी खासदार संभाजीराजे व दादूमामा ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर देसाई यांनी वारंवार पाठपुरावा केला.त्यानुसार विमानतळ प्राधिकरणाकडून कोल्हापूरविमानतळ येथे एअरविंग एनसीसीसाठी २.३५ एकर जागा ३० वर्षांच्या करारावर देण्यास मंजुरी दिली. विमानतळ प्राधिकरण व मुंबई एव्हिएशन अकॅडमी यांच्यात करारही झाला. मात्र, पुढे यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या केंद्राचे भिजत घोंगडे पडले आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मंत्री मोहोळ यांनी कोल्हापूरला एअरविंग एनसीसी सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

सतेज पाटील यांचा पाठपुरावाकोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना करिअरची नवीन संधी उपलब्ध करून देऊ शकणारी एअरविंग एनसीसी कोल्हापूर हेडक्वार्टरमध्ये सुरू करावी, असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी ३ ऑगस्ट २०२३ ला विधानपरिषदेत मांडला होता. यावर मंत्री संजय बनसोडे यांनी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले होते. आमदार पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर एअरविंगसाठीच्या जागेला सप्टेंबर २०२३ मध्ये मंजुरी देण्यात आली.

गेल्या अकरा वर्षांपासून मी कोल्हापुरात एअरविंग एनसीसी कोल्हापूर हेडक्वार्टरमध्ये सुरू करावी, यासाठी पाठपुरावा करत आहे. पण त्याचे गांभीर्य कुणाला नाही. - मुरलीधर देसाई, माजी वायु सैनिक, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळmurlidhar moholमुरलीधर मोहोळSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील