दि कोडोली अर्बन बँकेची वार्षिक सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:22 IST2021-02-14T04:22:51+5:302021-02-14T04:22:51+5:30
दि कोडोली अर्बन बॅंकेची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील सर्वोदय सांस्कृतिक हॉलमध्ये झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी सभापती ...

दि कोडोली अर्बन बँकेची वार्षिक सभा
दि कोडोली अर्बन बॅंकेची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील सर्वोदय सांस्कृतिक हॉलमध्ये झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी सभापती अमरसिंह पाटील होते.
उदयसिंह पाटील यांनी विविध सूचना सुचविल्या. अध्यक्ष यांनी याबद्दल सकारात्मकता दर्शविली. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा होऊन ते मंजूर करण्यात आले. उपाध्यक्ष सचिन जाधव, रघुनाथ चौगुले, अभिजित पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, संतोष गायकवाड, अशोक पोवार, बाळासाहेब माने, दिलीप गायकवाड, विवेक जाधव, मनोहर पाटील, लक्ष्मी चौगुले, राजेंद्र पाटील, कोडोली शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष माने यांनी सूत्रसंचालन केले, मनोहर पाटील यांनी आभार मानले.
फोटो ओळ
कोडोली येथील दि कोडोली अर्बन को. ऑप. बँकेच्या वार्षिक सभेत बोलताना राहुल पाटील, सोबत अमरसिंह पाटील, प्रकाश पाटील, अशोक पाटील आदी उपस्थित होते.