भडगावमध्ये करिगार सहकार समूहाची वार्षिक सभा खेळीमेळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:25 IST2021-09-11T04:25:24+5:302021-09-11T04:25:24+5:30
गुड्डादेवी दूध संस्थेचे अहवाल वाचन सचिव संगाप्पा भुसुरी यांनी केले. ते म्हणाले, सभासदांना १० टक्के डिव्हीडंड व दूध उत्पादकांना ...

भडगावमध्ये करिगार सहकार समूहाची वार्षिक सभा खेळीमेळीत
गुड्डादेवी दूध संस्थेचे अहवाल वाचन सचिव संगाप्पा भुसुरी यांनी केले. ते म्हणाले, सभासदांना १० टक्के डिव्हीडंड व दूध उत्पादकांना ७ लाखांचे रिबेट वाटप करण्यात येणार आहे.
दत्त सेवा संस्थेचे सचिव शीतल कब्बुर यांनी अहवाल वाचला. ते म्हणाले, संस्थेला ६ लाख ३१ हजारांचा नफा झाला असून, सभासदांना १० टक्केप्रमाणे लाभांश वाटप करण्यात येणार आहे.
विठ्ठल-रखूमाई महिला पतसंस्थेचे सचिव कुमार स्वामी यांनी अहवाल वाचला. संस्थेला ३ लाखाचा नफा झाला असून सभासदांना ९ टक्केप्रमाणे लाभांश वाटण्यात येणार आहे.
अध्यक्षीय भाषणात करिगार यांनी सर्व संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेऊन संस्थेच्या प्रगतीसाठी यापुढेही असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले. या वेळी सर्व संस्थांचे संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळी : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील आयोजित संयुक्त वार्षिक सभेत रामाप्पा करिगार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनिकेत कोणकेरी, आण्णासाहेब पाटील, सरपंच बसवराज हिरेमठ आदी उपस्थित होते.
क्रमांक : १००९२०२१-गड-०७