पंचगंगा कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:25 IST2020-12-31T04:25:07+5:302020-12-31T04:25:07+5:30

सुरूवातीला रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अहवाल सालात मृत झालेले संचालक, सभासद व इतर मान्यवरांना श्रध्दांजली वाहण्यात ...

The annual general meeting of Panchganga factory is in full swing | पंचगंगा कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

पंचगंगा कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

सुरूवातीला रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अहवाल सालात मृत झालेले संचालक, सभासद व इतर मान्यवरांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.

पाटील म्हणाले, चालू गळीत हंगामात कारखान्याने प्रतिटन ३०४० रुपये असा उच्चांकी दर दिला आहे. मागील सात वर्षाचा सरासरी दर पाहता आमच्या कारखान्याचा ऊसदर इतर कारखान्यांपेक्षा प्रति टन ५० रुपये ते ६० रुपये इतका जादा होतो. सध्या कारखान्यांना ऊस तोडणीची समस्या जाणवत आहे. तरी देखील सभासद शेतकऱ्यांनी चालू गळीत हंगामासाठी या आमच्या कारखान्यास नोंद केलेला सर्व ऊस गाळला जाईल.

यावेळी उपाध्यक्ष जयपाल कुंभोजे, संचालक धनगोंडा पाटील, कुमार खूळ, एम. आर. पाटील, कल्लू पिराई, सुनील तोरगल, प्रताप नाईक, प्रमोद पाटील, प्रताप पाटील, प्रकाश खोबरे, संतोष महाजन, भूपाल मिसाळ, रंजना निंबाळकर, शोभा पाटील, एन. वाय. भोरे, लक्ष्मण निंबाळकर, रावसाहेब पाटील, इंटक अध्यक्ष आझाद शेख यांच्यासह सभासद उपस्थित होते. संचालक रावसाहेब भगाटे यांनी आभार मानले.

(फोटो ओळी)

३०१२२०२०-आयसीएच-१२

पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत पी. एम. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: The annual general meeting of Panchganga factory is in full swing