विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाची घोषणा
By Admin | Updated: August 5, 2014 00:15 IST2014-08-04T23:40:38+5:302014-08-05T00:15:22+5:30
मुलींची आघाडी: सचिवांची निवड १४ आॅगस्टला

विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाची घोषणा
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील अधिविभाग आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी मंडळाची घोषणा आज, सोमवारी झाली. विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील सचिवांची निवड दि. १४ आॅगस्टला होणार आहे. त्यात मुलींनी आघाडी घेतली आहे.
विद्यार्थी मंडळासाठी निवड झालेले विद्यापीठातील अधिविभागनिहाय प्रतिनिधी : रेश्मा लव्हटे (मराठी), प्रीती अवघडे (हिंदी), सचिन वाले (इंग्रजी), राजश्री जगताप (इतिहास), सोनाली जाधव (राज्यशास्त्र), राजश्री म्हाकवे (अर्थशास्त्र), सुवर्णा ढोले (समाजशास्त्र), रागिणी शेटे (समाजकार्य), प्रियांका जाधव, अश्विनी नाईक (वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र), गौरी राऊत , सायली कवाळे, आशुतोष कोळी (कॉमर्स अॅण्ड मॅनेजमेंट), अर्चना शेवाळे (इंडस्ट्रीयल केमिस्ट्री), दीपाली पवार (रसायनशास्त्र), सौमित्रा जोगदंड (अॅप्लाइड केमिस्ट्री), कोमल पाटील (भौतिकशास्त्र), सुरभी पाटील (बायो केमिस्ट्री), जगदिश दळवी (वनस्पतीशास्त्र), हेतल पटेल (प्राणीशास्त्र), शुभांगी घाडगे (संख्याशास्त्र), कविता गाडेकर (इलेक्ट्रॉनिक्स), रसिया शेख, शिवानी पाटणकर (गणित), ज्योती पाटील (पर्यावरणशास्त्र), शुभांगी पाटील (अॅग्रो केमिकल अॅण्ड पेस्ट मॅनेजमेंट), फिजा मंगा (मायक्रो बायोलॉजी), देवश्री पाटील (बायो टेक्नॉलॉजी), पूजा शितोळे (फूड सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी), सायली शिंदे-सरनाईक (भूगोल), दीपाली यादव, झिबा शेख (संगणकशास्त्र), संतोष कांबळे (शिक्षणशास्त्र), राहुल सुतार (ग्रंथालय व व्यवस्थापनशास्त्र), सानिका मुतालिक (मास कम्युनिकेशन), कोणार्क शर्मा (संगीत व नाट्यशास्त्र विभाग). तसेच कुलगुरू नियुक्त प्रतिनिधींमध्ये प्रियांका पाटील (इंग्रजी), अनिता मुरगुंडे (वनस्पतीशास्त्र) यांचा समावेश आहे. विद्यापीठ अधिविभाग विद्यार्थी मंडळाच्या प्रतिनिधींची नियुक्ती गुणवत्तेवर केली आहे. त्यात ३८ पैकी ३२ प्रतिनिधी मुली आहेत. (प्रतिनिधी)