शाहू-स्वाभिमानीच्या उमेदवारांची उद्या घोषणा : सतेज

By Admin | Updated: January 24, 2017 00:29 IST2017-01-24T00:29:42+5:302017-01-24T00:29:42+5:30

उमेदवाराच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहून निवडून आणणार.

The announcement of Shahu-Swabhimani candidates tomorrow: Satej | शाहू-स्वाभिमानीच्या उमेदवारांची उद्या घोषणा : सतेज

शाहू-स्वाभिमानीच्या उमेदवारांची उद्या घोषणा : सतेज

शिरोली : शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघातील शाहू-स्वाभिमानी महाआघाडीच्या उमेदवारांची घोषणा बुधवारी करणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघात महाडिक यांच्या विरोधात सतेज पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. महाडिक यांच्या पराभवासाठी सतेज पाटील यांनी राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, जनसुराज्य, राष्ट्रवादी या सर्व पक्षांना एकत्र आणले आहे. या जिल्हा परिषद मतदारसंघातून सुचित्रा शशिकांत खवरे आणि रूपाली अनिल खवरे या दोघी जावा इच्छुक आहेत. दोघींनीही उमेदवारी मागितली आहे. सुचित्रा खवरे हातकणंगले पंचायत समितीच्या माजी उपसभापती होत्या, तर रूपाली खवरे या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या आहेत. शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघात महाडिक यांचा पराभव करण्यासाठी सतेज पाटील यांनी शाहू-स्वाभिमानी आघाडी आणि इतर सर्व पक्षांना घेऊन महाआघाडी केली आहे. दोन्ही इच्छुक उमेदवारांना बोलावून सतेज पाटील हे एकालाच उमेदवारी देऊन एकास एक लढत करणार आहेत. यामुळे दोघींपैकी एकास माघार घ्यावी लागणार आहे. (वार्ताहर)


मी जो उमेदवार देणार तो सर्वांना मान्य असेल आणि त्या उमेदवाराच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहून निवडून आणणार. उद्या, बुधवारी या उमेदवाराची घोषणा केली जाईल.
- सतेज पाटील, आमदार

Web Title: The announcement of Shahu-Swabhimani candidates tomorrow: Satej