आॅक्टोबर परीक्षेच्या अर्जांच्या तारखा जाहीर
By Admin | Updated: August 12, 2014 23:20 IST2014-08-12T21:56:16+5:302014-08-12T23:20:41+5:30
आॅनलाईन पध्दत : अंतिम मुदत २६ आॅगस्टपर्यंत

आॅक्टोबर परीक्षेच्या अर्जांच्या तारखा जाहीर
टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फ त घेण्यात येणाऱ्या आॅक्टोबर २०१४ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, खासगी विद्यार्थी व श्रेणी सुधार योजनेंतर्गत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावरुन आॅनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरणे अपेक्षित आहे.
विद्यार्थ्यांनी मंगळवार, १९ आॅगस्टपर्यंत शाळेमार्फत आॅनलाईन पद्धतीने आवेदनपत्र सादर करावीत. त्यानंतर विलंब शुल्कासह २६ आॅगस्टपर्यंत आवेदनपत्र स्वीकारण्यात येतील. नियमीत शुल्कासह आवेदनपत्र भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी व चलनाची प्रत शाळांनी शुक्रवार, २२ रोजी मंडळाकडे सादर करायची आहे. विलंब शुल्कासह आवेदनपत्र सादर केलेल्या विद्यार्थ्यांची यादी व चलनाची प्रत गुरुवार, २८ रोजी मंडळाकडे सादर करायची आहे. आवेदनपत्र भरण्यासाठी आॅनलाईन त्याचबरोबर आॅफलाईन पद्धतीचा वापर करता येणार आहे. आवेदनपत्र आॅफलाईन भरुन अपलोड करण्याची सुविधा मंडळाने उपलब्ध केली आहे.
मार्च २०१४ पूर्वीच्या विद्यार्थ्यांना आयसीटी विषयासाठी लागू नाही, असे दाखवावे लागणार आहे. त्यासाठी दुरुस्ती मेन पेजवर डाऊललोडस् या लिंकवर २२ू_ङ्मू३14ढअळउऌ या नावाने देण्यात आली असल्याचे मंडळाचे सचिव किरण लोहार यांनी सांगितले आहे. (वार्ताहर)