नगरपंचायतीची घोषणा केवळ लोकप्रियतेसाठीच
By Admin | Updated: March 15, 2016 00:34 IST2016-03-14T22:09:52+5:302016-03-15T00:34:31+5:30
\आजरा ग्रामपंचायत : नगरसेवक पदाची स्वप्ने पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास

नगरपंचायतीची घोषणा केवळ लोकप्रियतेसाठीच
ज्योतीप्रसाद सावंत--आजरा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याबाबतच्या विविध नेतेमंडळींकडून केल्या जाणाऱ्या घोषणा या केवळ सवंग लोकप्रियतेसाठीच असल्याचे स्पष्ट होत असून, गेली चार वर्षे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर नगरसेवक होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या मंडळींचा मात्र पुन्हा पुन्हा भ्रमनिरास होत आहे.
साडेतीन वर्षांपूर्वी आजरा ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यावेळी ग्रामपंचायतीची नगरपंचायत होणार, असे सांगत तंटामुक्ती समितीने निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्नही केला. यामुळे इच्छा असूनही अनेक इच्छुकांनी निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहणे पसंत केले. प्रत्यक्षात मात्र अद्याप ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर तर झालेले नाहीच; पण या चर्चेमुळे अनेकजण विनासायास सदस्य बनले आणि त्यांनी पदेही भोगली.