शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

बोनस नाकारल्याने मिरजमधील दूध उत्पादकांचा ‘गोकुळ’समोर संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:04 PM

गाईच्या दुधास बोनस देण्यास नकार देणाऱ्या गोकुळ दूध संघासमोर गुरुवारी मिरजेमधील दूध उत्पादकांनी एकत्र जमून संताप व्यक्त केला. संघाचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी संघाला परवडत नसल्यानेच हा निर्णय घेतला आहे; तथापि आपल्या भावना २२ आॅक्टोबरला होणाऱ्या संचालकांच्या बैठकीसमोर मांडू, असे आश्वासन दिल्यानंतर उत्पादक सभासदांनी आंदोलन मागे घेतले.

ठळक मुद्देबोनस नाकारल्याने मिरजमधील दूध उत्पादकांचा ‘गोकुळ’समोर संतापजो संघ बोनस देईल, सुविधा पुरवेल त्यांनाच दूध घालणार

कोल्हापूर : गाईच्या दुधास बोनस देण्यास नकार देणाऱ्या गोकुळ दूध संघासमोर गुरुवारी मिरजेमधील दूध उत्पादकांनी एकत्र जमून संताप व्यक्त केला. संघाचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी संघाला परवडत नसल्यानेच हा निर्णय घेतला आहे; तथापि आपल्या भावना २२ आॅक्टोबरला होणाऱ्या संचालकांच्या बैठकीसमोर मांडू, असे आश्वासन दिल्यानंतर उत्पादक सभासदांनी आंदोलन मागे घेतले.मिरज येथील मोहनराव शिंदे संघामार्फत ६० उत्पादकांकडून रोज ३५० लिटर गाईच्या दुधाचा पुरवठा गोकुळ दूध संघास गेल्या नऊ वर्षांपासून होतो. ‘गोकुळ’कडून त्यांना दरवर्षी दिवाळीच्या आधी एक रुपया पाच पैसे याप्रमाणे बोनसही दिला जातो.

यावर्षी कोल्हापूरमधील उत्पादकांना तो दिला आहे; पण मिरजेमधील उत्पादकांना दिला नसल्याचे लक्षात आल्याने याचा जाब विचारण्यासाठी मिरजेमधील सभासदांनी गुरुवारी दुपारी कोल्हापुरात ताराबाई पार्कातील ‘गोकुळ’चे कार्यालय गाठले.

नंदकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने चेअरमन आपटे यांच्यासमोर व्यथा मांडल्या. यावर आपटे यांनी दूध पावडरमधून संघाला तोटा झाला आहे. शासनाकडूनही मदत नाही; त्यामुळे कोल्हापूर वगळता अन्य बाहेरच्या जिल्ह्यांना बोनस द्यायचा नाही, असा निर्णय घेतला असल्याचे समजावण्याचा प्रयत्न केला; पण उत्पादकांनी मात्र बोनसचा आग्रह कायम ठेवला. यावेळी प्रताप रजपूत, पांडुरंग रजपूत, सुनील पाटील, मकरंद शिंदे, महादेव रजपूत, पोपट शिंदे, संदीप चंदनशिवे हे उत्पादक सभासद उपस्थित होते.दरम्यान, या संदर्भात देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बोनस देणे जर ‘गोकुळ’ला परवडत नसेल तर आम्हांलाही संघाला दूध घालणे परवडत नाही. आतापर्यंत ‘गोकुळ’ने खूप चांगले सहकार्य केले आहे; पण येथून पुढे जो संघ बोनस देईल, सुविधा पुरवेल त्यांनाच दूध घालणार आहोत, असे स्पष्ट केले.

 

 

टॅग्स :Gokul Milkगोकुळmiraj-acमिरजkolhapurकोल्हापूर