या नवीन योजना जाहीर
By Admin | Updated: May 25, 2015 00:23 IST2015-05-24T23:45:46+5:302015-05-25T00:23:46+5:30
‘महावितरण’च्या चार बड्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करणार

या नवीन योजना जाहीर
जिल्ह्यातील ५८८ फिडरसाठी फीडर व्यवस्थापन (फीडर मॅनेजमेंट) समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत बेरोजगार अभियंते, निवृत्त अभियंते यांना काम दिले जाणार आहे; तर त्यांच्याबरोबरच आयटीआय झालेल्या सहा बेरोजगारांनाही काम
या योजनेत ७५ लाखांचे काम बेरोजगारांना आधीचे काम व्यवस्थित केल्यानंतर मिळणार आहे. याशिवाय वीज चोरी पकडणाऱ्या फीडर मॅनेजमेंटला पकडलेल्या वीजचोरीच्या रकमेच्या २० टक्के रक्कम बक्षीस देणार.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार येत्या
‘महावितरण’च्या चार बड्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करणार
चंद्रशेखर बावनकुळे : ३०० कोटींची कामे वेळेत पूर्ण नाहीत
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ‘महावितरण’ची ३०० कोटींची कामे दिलेल्या प्रतिभा अॅँड प्रतीक, श्रीम इलेक्ट्रिकल्स, सुनील हायटेक आणि बी. व्ही. जी. या चार बड्या ठेकेदार कंपन्यांनी वेळेत कामे पूर्ण केली नाहीत. त्यांनी कामे पूर्ण न करता महावितरणची फसवणूक केली. या प्रकरणी या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्री उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
बावनकुळे म्हणाले, कोल्हापुरात शून्य टक्के वीजगळती आहे. याशिवाय येथील ग्राहक वीज वापरल्यानंतर १०० टक्के पैसे भरतो. मात्र, महावितरण या ग्राहकांना सेवा देताना कमी पडत आहे, कामात कुचराई करीत आहे, अशी त्यांनी स्पष्ट कबुली दिली.
कोल्हापुरात ८००० हून अधिक ग्राहकांना वीज कनेक्शन मिळावे म्हणून जिल्ह्यात आघाडी सरकारने ३०० कोटींची कामे काही कंत्राटदारांना वाटली होती. यामध्ये या कंत्राट दिलेल्या कंपन्यांनी कामात चालढकल केली. ही कामे अर्धवटच राहिली आहेत. या कंत्राटदार कंपन्यांनी महावितरणकडे अनामत रक्कम म्हणून ठेवलेली १० टक्के रक्कम जप्त करण्याचे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कोल्हापुरात महावितरणची सेवा सुरळीत व्हावी, याकरिता जिल्ह्यात ५० टक्के फीडर, ट्रान्सफॉर्मर, आदी नवीन यंत्रणा उभारण्याकरिता एकूण ५५० कोटी रुपयांचे नवीन पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये शहराबरोबरच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वीज वितरण सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
आढावा बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील सर्व कामकाजाचा बारकाईने आढावा घेतला. तसेच रखडलेल्या व नागरिकांना हेलपाटे मारावयास लावणाऱ्या कामाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. (प्रतिनिधी)
मंगळवार (दि. २६) पर्यंत देऊ
शेतातील वाकलेल्या पोलदुरुस्तीसाठी २० कोटींची जादाची तरतूद
राजीव गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना ५० टक्के रकमेत वीज कनेक्शन देणार
गावात न राहणाऱ्या ाहावितरणच्या अभियंत्यांचे घरभाडे पगारातून रद्द
वीजचोरीबद्दल सर्व पोलीस ठाण्यांना तक्रार दाखल करण्याची सोय.