लाटवडेत हिंदुराव पाटील पतसंस्थेचा वर्धापनदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:31 IST2021-09-10T04:31:39+5:302021-09-10T04:31:39+5:30
संस्थेचे संस्थापक शंकर पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संस्थेने अल्पवधीत प्रगती केली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा करून त्यांची ...

लाटवडेत हिंदुराव पाटील पतसंस्थेचा वर्धापनदिन उत्साहात
संस्थेचे संस्थापक शंकर पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संस्थेने अल्पवधीत प्रगती केली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा करून त्यांची आर्थिक प्रगती करण्यासाठी नेहमीच सहकार्य केले आहे. संस्थेची १५ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे, अशी माहिती अध्यक्ष वसंतराव पाटील यांनी दिली.
यावेळी हनुमान विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, पतसंस्थेचे संचालक मौक्तिक पाटील, भीमराव निरुखे, जालिंदर पाटील, माजी उपसरपंच उत्तम पाटील, सुभाष पाटील, डी. के.पाटील, सुरेश पाटील, शिवाजी शिर्के, आनंदराव पाटील, सर्जेराव पाटील, उत्तम निर्मळे, उत्तम बापूसो पाटील, लालासाहेब पाटील उपस्थित होते.
आभार शाखाधिकारी नीतेश पाटील यांनी मानले.
फोटो ओळी-लाटवडे येथील हिंदुराव पाटील पतसंस्थेच्या वर्धापनदिनप्रसंगी शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी श्रीकांत पाटील, मौक्तिक पाटील, उत्तम पाटील, वसंत पाटील, भीमराव निरुखे, सुरेश पाटील, सुभाष पाटील, जालिंदर पाटील, सर्जेराव चौगुले उपस्थित होते.