दत्तगुरू क्रेडिट सौहार्दचा वर्धापन दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST2021-08-20T04:29:07+5:302021-08-20T04:29:07+5:30
कोगनोळी : येथील श्री दत्तगुरू क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचा ५ वा वर्धापन दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. ...

दत्तगुरू क्रेडिट सौहार्दचा वर्धापन दिन
कोगनोळी : येथील श्री दत्तगुरू क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचा ५ वा वर्धापन दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
चेअरमन सचिन खोत यांनी निपाणीसह हदनाळ, मत्तीवडेसारख्या ग्रामीण भागात संस्था उभी करून नावारूपास आणली आहे, असे गौरवोद्गार यावेळी वीरकुमार पाटील यांनी काढले.
श्री दत्तगुरू क्रेडिट सौहार्दच्या प्रधान शाखेमध्ये वर्धापन दिनानिमित्त चेअरमन सचिन खोत यांच्या हस्ते लक्ष्मी पूजन करण्यात आले. संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज पाटील, अनिल चौगुले, प्रकाश कदम, प्रकाश गायकवाड, प्रवीण पाटील, मारुती कोळेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व विविध सेवा संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी व्हाईस चेअरमन महादेव मिरजे, जनरल मॅनेजर सागर बाळीकाई, हदनाळ शाखाधिकारी विजय खोत, यांच्यासह संस्थेचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
(छाया : बाबासो हळिज्वाळे)
फोटो ओळ :
श्री दत्तगुरू क्रेडिट सौहार्दच्या वर्धापन दिनानिमित्त कर्नाटक राज्याचे माजी उर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.