शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी आण्णासाहेब शिरगावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:52+5:302021-07-14T04:28:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आण्णासाहेब शिरगावे यांची तर उपाध्यक्षपदी बाजीराव कांबळे यांची बिनविरोध ...

शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी आण्णासाहेब शिरगावे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आण्णासाहेब शिरगावे यांची तर उपाध्यक्षपदी बाजीराव कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी शहर उपनिबंधक प्रकाश जगताप होते. अध्यक्षपदासाठी शिरगावे यांचे नाव प्रशांतकुमार पोतदार यांनी सूचविले त्यास संभाजी बापट यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी बाजीराव कांबळे यांचे नाव अरुण पाटील यांनी सुचविले त्यास साहेब शेख यांनी अनुमोदन दिले. यावेळी राजमाेहन पाटील, बजरंग लगारे, नामदेव रेपे, शिवाजी पाटील, जी. एस. पाटील, दिलीप पाटील, स्मिता डिग्रजे, ॲड. संदीप पाटील, सुमन पोवार, सुकाणू समितीचे नेते दा. शं. सुतार, शिवाजी पाटील, राजाराम वरुटे, दिलीप बच्चे, पी. के. पाटील, वसंत जोशीलकर, रवींद्र नागटिळे, राजू जुगळे उपस्थित होते.