आण्णासाहेब चौगुले यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:19 IST2021-05-29T04:19:25+5:302021-05-29T04:19:25+5:30
आण्णासाहेब शांताप्पा चौगुले (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राचा मार्गदर्शक हरपला. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली,नातू ...

आण्णासाहेब चौगुले यांचे निधन
आण्णासाहेब शांताप्पा चौगुले (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राचा मार्गदर्शक हरपला.
त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली,नातू असा परिवार आहे. खरेदी विक्री संघाचे संचालक आप्पासाहेब चौगुले, डाॅ. विजयकुमार चौगुले यांचे वडील होत.
तालुक्याच्या सहकार चळवळीतील मार्गदर्शक असणाऱ्या आण्णासाहेब चौगुले यांचा जन्म २० ऑक्टोबर १९२७ ला झाला. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार, दिनकरराव मुद्राळे, पी.बी. पाटील यांच्यासमवेत काम केले होते. त्यांनी पंचगंगा सहकारी साखर कारखाना, शरद साखर कारखाना उभारणीत पुढाकार घेतला होता. १९५० मध्ये नरंदे विकास सेवा संस्थेचे संस्थापक संचालक म्हणून त्यांनी आपल्या सहकारातील कारकिर्दीची सुरुवात केली. या संस्थेचे ते दहा वर्षे अध्यक्ष होते. १९५२ ते १९९२ पर्यंत ग्रामपंचायत सदस्य, सरपंचही होते.
तालुका पातळीवरील देखरेख संघात १० वर्षे तर वडगाव बाजार समितीत १३ वर्षे सभापती होते. हातकणंगले तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे ५८ वर्ष संचालक तर २७ वर्ष अध्यक्ष होते. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे १९७८ ते १९८९ पर्यंत संचालक होते. कोल्हापूर जिल्हा सूतगिरणी, वारणा सहकारी दूध उत्पादक संघ, शेतकरी संघ, जिल्हा देखरेख संघाचे संचालक होते. तसेच राज्य पातळीवरील बाजार समिती महासंघ, सहकारी संघ, देखरेख संघ, पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी मंडळ, पुणे येथे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. सहकारी जगत या राज्यस्तरीय मासिकांचे मानद सचिव होते.
२८ अण्णासाहेब चौगुले निधन