शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतून आता दूध संस्थांचा कारभार चालणार, पशुसंवर्धन विभागाचे होणार विलीनीकरण

By समीर देशपांडे | Updated: May 10, 2024 13:52 IST

पशुसंवर्धन उपायुक्त सीईओंच्या हाताखाली

समीर देशपांडेकोल्हापूर : आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला आता मोठे महत्त्व येणार आहे. कारण शासनाचा पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा दुग्धविकास अधिकारी यांचे कार्यालय आता जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे आता दूध संस्थांच्या कारभाराचे नियंत्रणही जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येणार आहे.सध्या शासनाचा आणि जिल्हा परिषदेचा असे दोन पशुसंवर्धन विभाग सुरू आहेत. परंतु शासनाचा विभाग आणि जिल्हा दुग्ध विकास अधिकारी कार्यालय जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा निर्णय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला असून त्याला मंत्रिमंडळाचीही मंजुरी मिळाली आहे. फक्त शासन आदेश निघणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. लोकसभा आचारसंहितेआधी असा आदेश काढण्यासाठी प्रयत्न झाले, परंतु ते शक्य झाले नाही.या नव्या रचनेत जिल्ह्यात जितके श्रेणी २ चे पशुसंवर्धन दवाखाने आहेत ते श्रेणी १ होणार असून त्या ठिकाणी वर्ग १ चे पशुधन विकास अधिकारी कार्यरत राहणार आहेत. तसेच प्रत्येक तालुक्याला पशुसंवर्धन सहायक आयुक्त हे पद राहणार आहे. जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांचे कार्यालयच जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात येणार असल्याने दूध संस्थांची नोंदणी आणि रद्दची प्रक्रिया, निवडणुका हा सर्व कारभार जिल्हा परिषदेतून होणार आहे.कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दूध संस्थांची स्थापना झाली असून गावागावातील राजकीय व्यवस्थेला बळ देणारी संस्था म्हणून या संस्थांकडे पाहिले जाते. याआधी अनेक वेळा पशुसंवर्धन विभागाकडे शासनासह पदाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष असायचे. मात्र या नव्या निर्णयामुळे या विभागालाही मोठे महत्त्व येणार आहे. त्यामुळे भविष्यकाळात या विभागाचे सभापतीपद मिळवण्यासाठीही जिल्हा परिषदेत रस्सीखेच पाहावयास मिळणार आहे. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर याबाबतचा शासन आदेश निघणार असल्याचे सांगण्यात आले.

पशुसंवर्धन उपायुक्त सीईओंच्या हाताखालीया नव्या बदलामुळे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी हे पद कमी होणार असून या ठिकाणी पशुसंवर्धन उपायुक्त हे या विभागाचे प्रमुख असतील आणि ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतील. तसेच त्यांच्या हाताखाली योजना, तांत्रिक कामकाज आणि गुणवत्ता नियंत्रणाचे काम पाहणारे असे तीन स्वतंत्र सहायक आयुक्त कार्यरत राहतील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmilkदूधzpजिल्हा परिषद