शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ..अन् जयसिंगपूर रेल्वेस्थानकावर संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोखली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 12:58 IST

जयसिंगपूर : कोल्हापूर - मिरज पॅसेंजर जयसिंगपूर रेल्वे स्थानकावर एक तास थांबविल्याने मिरजेकडे जाणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर बुधवारी (दि. ...

जयसिंगपूर : कोल्हापूर - मिरज पॅसेंजर जयसिंगपूर रेल्वे स्थानकावर एक तास थांबविल्याने मिरजेकडे जाणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर बुधवारी (दि. ७) गोंधळ घातला. मिरज स्थानकातील प्लॅटफॉर्मवरील लोंढा रेल्वे चुकल्यामुळे लोंढ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांनी जयसिंगपूर येथे रेल्वे रोखून काही काळ जाब विचारला. लोंढा रेल्वेसाठी केलेले बुकिंगचे पैसे द्या, अशी मागणी करत प्रवाशांनी गोंधळ घातला.कोल्हापूरमधून निघालेली कोल्हापूर - मिरज रेल्वे रुकडी, हातकणंगलेबरोबरच जयसिंगपूर रेल्वे स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबविण्यात आली. पॅसेंजर, वंदे भारत रेल्वेमुळे जवळपास एक तास रेल्वे जयसिंगपूर स्थानकावर थांबली होती. मिरज स्थानकावर पोहोचल्यावर लोंढा गाडीचे आरक्षण प्रवाशांनी केले होते. मात्र रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर स्थानकावर जवळपास दीड तास गाडी थांबल्याने लोंढा गाडी चुकल्याने प्रवाशांनी रेल्वे चालकाला जाब विचारला. नोकरदार व प्रवासी या रेल्वेतून प्रवास करत होते. कोल्हापूरमधून रेल्वे सुटल्यानंतर मिरज स्टेशनवर पोहोचल्यानंतर लगेचच मिरजेतून लोंढा रेल्वे पकडण्यासाठी प्रवाशांनी तिकीट काढले होते. कोल्हापूर - मिरज रेल्वे रुकडी, हातकणंगले व जयसिंगपूर स्थानकावर जवळपास पावणेदोन तास खोळंबल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली, तर लोंढाकडे जाणाऱ्या प्रवाशांनी याचा जाब विचारत काही काळ जयसिंगपूर स्थानकात गोंधळ घालत रेल्वे रोखून धरली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे