कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर सीपीआरमध्ये अन्जोप्लास्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:38 IST2021-05-05T04:38:44+5:302021-05-05T04:38:44+5:30
कोल्हापूर येथील राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर येथे इचलकरंजी येथील ...

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर सीपीआरमध्ये अन्जोप्लास्टी
कोल्हापूर येथील राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर येथे इचलकरंजी येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ४९ वर्षांच्या पुरुष रुग्णांवर यशस्विरीत्या अन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली.
इचलकरंजी येथील या रुग्णाला २० एप्रिल रोजी सीपीआरमध्ये पोलिसांनी दाखल केले होते. २४ एप्रिलला त्याच्या छातीत दुखू लागले. सीपीआरचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अक्षय बाफना यांनी ईसीजी केल्यानंतर त्याला हृदयरोगाची लक्षणे जाणवली. रक्त पातळ होण्याच्या गोळ्या देऊन पहिल्यांदा अन्जोग्राफी करण्यात आली. त्यामध्ये ९० टक्के ब्लॉकेज आढळल्याने अन्जोप्लास्टी करण्यात आली.
महात्मा जोतिबा फुले योजनेतून ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय बरगे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अक्षय बाफना, यांनी तसेच डॉ. वरूण देवकाते, भूलतज्ज्ञ डॉ. प्रदीप राऊत तसेच देवेंद्र शिंदे, उदय बिरांजे, अरूण पाटील, कृष्णा सावंत यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.