शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

मुलीला प्रेमाचे एसएमएस पाठविल्याचा राग, तरुणास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 1:21 PM

मोबाईलवरून मुलीला प्रेमाचे एसएमएस पाठविल्याप्रकरणी चौघांनी काठीने केलेल्या मारहाणीत योगेश सिद्धार्थ कांबळे (वय २५ रा. माळ्याची शिरोली, ता. करवीर) हा जखमी झाला.

ठळक मुद्देमुलीला प्रेमाचे एसएमएस पाठविल्याचा राग, तरुणास मारहाणमाळ्याची शिरोली येथील चौघांवर गुन्हा 

कोल्हापूर : मोबाईलवरून मुलीला प्रेमाचे एसएमएस पाठविल्याप्रकरणी चौघांनी काठीने केलेल्या मारहाणीत योगेश सिद्धार्थ कांबळे (वय २५ रा. माळ्याची शिरोली, ता. करवीर) हा जखमी झाला.

हा प्रकार पुईखडी येथील एका मंगल कार्यालयापाठीमागे १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी संशयित श्रीधर कांबळे (रा. हळदी), धीरज कांबळे, अरविंद कांबळे, राकेश कांबळे (सर्व रा. सडोली खालसा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.करवीर पोलिसांनी सांगितले की, योगेश कांबळे हा इंडियन बुल्स कंपनीच्या मोबाईल अ‍ॅपवरून आॅनलाईन फायनान्स मंजुरीचे काम करतो. श्रीधर कांबळे यांना कर्जाची गरज असल्याने त्यांची ओळख संशयित योगेश याच्याबरोबर झाली. या ओळखीतून त्याने श्रीधर यांच्याकडून मोबाईल क्रमांक घेतला होता.

या मोबाईलवरून तो त्यांच्या मुलगीसोबत एसएमएसद्वारे चॅटिंग करू लागला. त्याने मुलीला प्रेमाचे एसएमएस पाठविले. हा प्रकार घरी कळल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी संशयित चौघांनी त्याला पुईखडी येथे बोलावून घेतले. त्याला मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवून एका मंगल कार्यालयापाठीमागे नेऊन काठीने मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. पोलीस निरीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर