कोल्हापूर : जिल्ह्यातील ३ हजार ९१५ अंगणवाड्यांपैकी २ हजार ४७२ अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती आहेत. १४४३ अंगणवाड्यांना इमारती नाहीत. परंतु तरीही उघड्यावर कुठे अंगणवाडी भरते असे कुठेही चित्र नाही. खासगी, भाड्याने घेतलेल्या जागा, मंदिर, समाजमंदिर, ग्रामपंचायत मालकीच्या इमारती आणि प्राथमिक शाळांमध्ये १४४३ अंगणवाड्या भरवल्या जात आहेत.
चार हजार अंगणवाड्यांत एक लाख बालकेजिल्ह्यातील ३ हजार ९१५ अंगणवाड्यांमध्ये १ लाख ४५ हजार ८५७ मुले, मुली असून त्यांच्या पोषण आहाराचीही दक्षता घेतली जाते.
स्वत:च्या जागेत २४७२ अंगणवाड्यालोकप्रतिनिधींच्या आग्रहामुळे दरवर्षी अंगणवाडी इमारतींसाठी निधी मंजूर करण्यात येतो. त्यामुळे तब्बल २ हजार ४७२ अंगणवाड्या या मालकीच्या इमारतीमध्ये भरवण्यात येतात.
कुठे भरवल्या जातात अंगणवाड्या?उर्वरित १४४३ अंगणवाड्या या भाड्याच्या जागेत, प्राथमिक शाळा खोल्या किंवा व्हारांडा, देवूळ किंवा समाजमंदिरात भरवण्यात येतात.उघड्यावर कुठेही अंगणवाडी नाहीजिल्ह्यात कुठेही अंगणवाडी उघड्यावर भरवली जात नाही. भाड्याच्या जागा असल्या तरीही मुला-मुलींना सोयीचे होईल अशाच ठिकाणी निवडण्यात आल्या आहेत.
शिजवूनच आणला जातोय पोषण आहारसंबंधित ठेकेदार हा घरून शिजवूनच पोषण आहार आणत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कुठेही अंगणवाडीच्या आवारात उघड्यावर आहार शिजवला असे होत नाही.
टॉयलेट अस्वच्छकाही ठिकाणी टॉयलेट अस्वच्छ असल्याचे पहावयास मिळते. या स्वच्छतेसाठी स्वतंत्र मनुष्यबळ किंवा आर्थिक तरतूद नसल्याचा हा परिणाम आहे.
कोणत्या तालुक्यात किती अंगणवाड्या तालुका - अंगणवाड्या - स्वत:ची इमारतीकरवीर १ - २२५ - १७१करवीर २ - २०९ - १२६हातकणंगले - २०५ - ११४हातकणंगले २ - १४९ -७६शिरोळ - १८५ -१०३शिरोळ २ - १९८ -१०८गगनबावडा - ८५ - ७७आजरा - २०९ - १४५भुदरगड - २७० - १५९चंदगड - २९६ - १७२गडहिंग्लज - २८७ - १७७कागल - ३१५ - २१४पन्हाळा - ३४७ - २१४राधानगरी - ३३८ - २४१शाहूवाडी - ३२५ - २०४कोल्हापूर ग्रामीण - २७२ - १७१एकूण - ३९१५ - २४७२