शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांना मिळणार लाडक्या बहिणींचा भत्ता, कोल्हापूर जिल्ह्याला किती मिळाला निधी.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 17:22 IST

चारचाकीवाल्या महिलांचा आकडा फुगला

कोल्हापूर : लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबविण्यात मोलाचा वाटा निभावणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अखेर योजनेचा भत्ता पुढील आठ दिवसांत मिळणार आहे. त्यासाठी जिल्ह्याला दीड कोटीचा निधी आला आहे. जिल्हा महिला व बालकल्याण विभागातर्फे अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर प्रत्येक अर्जाला ५० रुपये याप्रमाणे रक्कम वर्ग केली जाणार आहे.निवडणुकीच्या ताेंडावर राज्य शासनाने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना राबविण्याची मुख्य जबाबदारी अंगणवाडी सेविकांकडे दिली गेली. त्या-त्या भागातील अंगणवाडी सेविकांनी तेथील महिलांचे अर्ज सुरुवातीला ऑफलाइन व नंतर ऑनलाइन पद्धतीने भरले. अधिकाधिक महिलांचे अर्ज भरले जावेत, यासाठी शासनाने प्रत्येक अर्जामागे ५० रुपये असा भत्ता जाहीर केला. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी मोठ्या संख्येने अर्ज भरले.

एका सेविकेने एक ते दीड हजार अर्ज भरले आहेत. लाभार्थी महिलांना पुढील दोन महिन्यांतच लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे पैसे मिळायला सुरू झाले; पण अर्ज भरण्याचे महत्त्वाचे काम केलेल्या अंगणवाडी सेविका भत्त्यापासून वंचित होत्या. त्यांना गेली आठ महिने भत्ता मिळालेला नाही. अखेर त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.शासनाकडून जिल्ह्यासाठी दीड कोटीचा निधी आला असून, तो जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे वर्ग झाला आहे. याचे बिल सध्या कोषागार कार्यालयाकडे गेले आहे. त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील आठवडाभरात अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर त्यांनी भरलेल्या अर्जांच्या संख्येनुसार रक्कम वर्ग केली जाईल.

चारचाकीवाल्या महिलांचा आकडा फुगलानिकषात बसत नसलेल्या चारचाकी वाहन असलेल्या १४ हजार लाडक्या बहिणींची यादी राज्य शासनाने महिला बालविकास विभागाला पाठवली होती. या महिलांच्या घरोघरी अंगणवाडी सेविका जाऊन पडताळणी करणार आहेत. तसेच आरटीओकडेदेखील याची एक यादी पाठवण्यात आली आहे. मात्र, यादीमध्ये त्रुटी असून काही महिलांची नावे वारंवार यादीत आली आहेत. त्यामुळे निकषात न बसणाऱ्या महिलांचा आकडा फुगला आहे. ही बाब विभागाने राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर यादीची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. ताेपर्यंत तरी लाभार्थी महिलांची चौकशी होणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरladki bahin yojanaलाडकी बहीण योजना