शहरं
Join us  
Trending Stories
1
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
2
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
3
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
4
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
5
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
6
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक
7
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
8
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
9
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
10
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
11
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
12
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
13
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
14
जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
15
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
16
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
17
नव्या उच्चांकासाठी बाजार सज्ज, एक्झिट पोलमधून देशात स्थिर सरकारचे येण्याचे संकेत
18
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
19
प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम
20
एआय एक्झिट पोलमध्येही 'कमळ'; पण इंडियाच्याही जागा वाढणार

अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून बिंदू चौकात केंद्र सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 7:37 PM

वर्षानुवर्षे संघर्ष करून मिळविलेले कामगार कायदे कोरोनाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत केंद्र सरकार बदलत आहे. कामगारांचे हक्क हिरावणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या या कृतीचा निषेध शुक्रवारी बिंदू चौकात निदर्शनाने करण्यात आला. ऑल इंडिया ट्रेड युनियनच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेने निदर्शनात सहभाग घेतला.

ठळक मुद्देअंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून बिंदू चौकात केंद्र सरकारचा निषेधप्रोत्साहन भत्त्यासाठी आग्रह

कोल्हापूर : वर्षानुवर्षे संघर्ष करून मिळविलेले कामगार कायदे कोरोनाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत केंद्र सरकार बदलत आहे. कामगारांचे हक्क हिरावणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या या कृतीचा निषेध शुक्रवारी बिंदू चौकात निदर्शनाने करण्यात आला. ऑल इंडिया ट्रेड युनियनच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेने निदर्शनात सहभाग घेतला.संपूर्ण देशात कायदे बदलण्याचा धडाका केंद्र सरकारकडून सुरू आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीने जनता हैराण आहे; पण केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याच्या विरोधात शुक्रवारी डाव्या पक्षांकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती.

कोल्हापुरात संघटनेचे राज्य सरचिटणीस नामदेव गावडे, चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली बिंदू चौकात सकाळी आंदोलन झाले. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यात रघुनाथ कांबळे, सतीशचंद्र कांबळे, गिरीश फोंडे, शुभांगी पाटील, सुभाष गुरव, प्रशांत आंबी, इरशाद मुजावर यांनी सहभाग घेतला.प्रोत्साहन भत्त्यासाठी आग्रहकोविड योद्धा म्हणून लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून अंगणवाडी कर्मचारी आरोग्य विभागाला मदत करीत आहेत. सर्व्हे असू दे की औषध वाटप. प्रत्येक वेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस काम करीत आहेत; पण त्यांना केवळ एकच महिन्याचा प्रोत्साहन भत्ता दिला आहे. पुढील महिन्यांचा भत्ता दिलेला नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. शुक्रवारी झालेल्या आंदोलनात या कर्मचाऱ्यांनी हा भत्ता देण्याची आग्रही मागणी केली.आंदोलकांच्या मागण्या

  • कामगार कायदे पूर्ववत करा, त्यांत बदल करू नये
  • सार्वजनिक उद्योगांचे होणारे खासगीकरण थांबवावे.
  • असंघटित कामगारांना कोविड प्रोत्साहन भत्ता द्यावा.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरLabourकामगार