शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविका, मदतनिसांना तंदुरुस्त दाखला द्या, सीपीआरच्या सुप्रिया देशमुख धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 16:32 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एका दिवसात तंदुरुस्त दाखला द्यावा, या मागणीसाठी येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांना सोमवारी धारेवर धरले. या मागणीसाठी प्रशासन जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप अंगणवाडी मदतनीस, सेविकांनी देशमुख यांच्यासमोर केला.

ठळक मुद्दे अंगणवाडी सेविका, मदतनिसांना तंदुरुस्त दाखला द्या, सीपीआरच्या सुप्रिया देशमुख धारेवर कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एका दिवसात तंदुरुस्त दाखला द्यावा, या मागणीसाठी येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांना सोमवारी धारेवर धरले. या मागणीसाठी प्रशासन जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप अंगणवाडी मदतनीस, सेविकांनी देशमुख यांच्यासमोर केला.अंगणवाडी सेविका, मदतनिसांना नोकरीत नेमणूक देताना त्यांची वयाची ६५ वर्षे किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम असेपर्यंत त्यांना नोकरीत ठेवण्याबाबत शासनाचे परिपत्रक आहे. तथापि, मध्यंतरी शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६५ वरून ६० केले; मात्र त्यानंतर ते पूर्ववत ६५ वर्षे केले. परंतु, ज्यांची ६० वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांना शारीरिक सक्षमतेचा दाखला हजर करण्याची अट घातली.याबाबत गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस सीपीआरमध्ये येतात; पण जाणीवपूर्वक त्रास देत चुकीच्या पद्धतीने तपासणी केली जात आहे. तसेच काही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ज्येष्ठ सेविकांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. याप्रश्नी सोमवारी जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे आप्पा पाटील व जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ सीपीआर जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांना भेटण्यासाठी गेले; परंतु केम्पीपाटील हे आजारी असल्याने ते रजेवर आहेत. त्यामुळे शिष्टमंडळाने डॉ. सुप्रिया देशमुख यांची भेट घेतली.यावेळी आप्पा पाटील म्हणाले, अंगणवाडी सेविका, मदतनिसांची कोणतीही अडवणूक न करता तंदुरुस्त दाखला द्यावा. त्यासाठी शासनाने गुरुवार (दि. ३१) पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे ते लवकरात लवकर मिळावे.

यावर डॉ. सुप्रिया देशमुख म्हणाल्या, सीपीआर हे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या अखत्यारित येते. मात्र, तंदुरुस्त दाखला देण्याचा अधिकार हा जिल्हाशल्यचिकित्सक यांच्याकडे आहे. अंगणवाडी सेविका, मदतनिसांना लवकर दाखला देऊ. शिष्टमंडळात शोभा भंडारे, सरिता कंदले, दिलशाद नदाफ, मालन पाटील, सुनंदा कुराडे, सुरेखा कोरे, मंगल गायकवाड, बेबी चुडाप्पा, शमा पठाण, आदींचा सहभाग होता. 

 

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर