शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तरीही शासनाकडून उपेक्षित अंगणवाडी कर्मचारी मानधनाच्या प्रतीक्षेत; ‘कोरोना’च्या संकटात रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 17:15 IST

सर्वाधिक काम आणि मोबदला कमी असणारा कोणता घटक असेल तर तो अंगणवाडीचे कर्मचारी. शासनाची कोणतीही योजना असू दे; तिचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असते. अंगणवाडीतील काम करून शासनाचे काम करायला त्यांची कधी ना नसते.

तरीही शासनाकडून उपेक्षित अंगणवाडी कर्मचारी मानधनाच्या प्रतीक्षेत;  ‘कोरोना’च्या संकटात रस्त्यावर

कोल्हापूर : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे फेबु्रवारी व मार्च या दोन महिन्यांचे मानधन प्रलंबित राहिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाचे संकट सगळीकडे आहे. या संकटातही मोठ्या धैर्याने घरोघरी जाऊन सर्व्हेक्षणाची जबाबदारी हेच कर्मचारी पार पाडत आहेत.

सर्वाधिक काम आणि मोबदला कमी असणारा कोणता घटक असेल तर तो अंगणवाडीचे कर्मचारी. शासनाची कोणतीही योजना असू दे; तिचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असते. अंगणवाडीतील काम करून शासनाचे काम करायला त्यांची कधी ना नसते.

फेबु्रवारी व मार्चचे मानधन अद्याप झालेले नाही. सध्या अंगणवाडी सेविकांना आठ हजार तर मदतनिसांना ४२०० रुपये मानधन दरमहा मिळते. त्यांचे काम पाहिले तर हे मानधन फारच तुटपुंजे आहे. तेही वेळेत मिळत नसल्याने अडचणी निर्माण होतात. सध्या सगळीकडे कोरोनाचे संकट उभे आहे. अशा परिस्थितीत सगळे घरात बसले असताना अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर आहेत. प्रत्येक घरात जाऊन कोरोना रुग्णांचे सर्वेक्षणाची जबाबदारी शासनाने त्यांच्यावर दिली आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून त्या घरोघरी फिरत आहेत. त्यासाठी शासनाने त्यांना एक हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्याची घोषणा जरी केली असली तरी जोखीम उचलून त्या कोरोनाविरोधातील लढाईत उतरले आहेत. अशा परिस्थिती त्यांचे मनोधैर्य उंचावण्याची जबाबदारी शासनाची आहे. तसे होताना दिसत नसून फेबु्रवारीपासूनचे मानधनच त्यांना दिलेले नाही.दहा महिन्यांचा फरक वाटप सुरूआॅक्टोबर २०१९ पासूनचा अंगणवाडी कर्मचाºयांचा फरक देय होता. त्याचे वाटप सुरू झाले असून बहुतांश तालुक्यातील कर्मचाºयांना हे पैसे मिळालेले आहेत. 

‘कोरोना’च्या संकटात सेविका व मदतनीस सर्व्हेक्षण व जनजागरणाचे काम करीत आहेत. यातील बहुतांश कर्मचाºयांचे हातावरील पोटे आहेत. लॉकडाऊन आणि त्यात मानधन नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. शासनाने मानधनाबरोबरच पुढील महिन्याचे आगाऊ पैसे दिले पाहिजेत. याबाबत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे मागणी केली आहे.- सुवर्णा तळेकर (नेत्या, अंगणवाडी कर्मचारी संघटना)----------------------------------------------------(राजाराम लोंढे)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMONEYपैसा