शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

अंगणवाडी सेविकांची सेवासमाप्ती ६०व्या वर्षी : शासनाचा निर्णय-मानधनवाढ देऊन भाकरी घेतली काढून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:56 AM

कोल्हापूर : अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या सेवासमाप्तीचे वय ६५ वरून ६० करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासंबंधीचा आदेश २३ फेब्रुवारीस महिला व बालविकास विभागाने काढला असून,

विश्वास पाटील ।कोल्हापूर : अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या सेवासमाप्तीचे वय ६५ वरून ६० करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासंबंधीचा आदेश २३ फेब्रुवारीस महिला व बालविकास विभागाने काढला असून, त्याविरोधात अंगणवाडी तार्इंतून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. नव्या आदेशामुळे राज्यातील १३ हजारांहून अधिक अंगणवाडी कर्मचाºयांना एक एप्रिलपासून घरी जावे लागणार आहे. अशा कर्मचाºयांची यादी बनविण्याचे आदेश सर्व जिल्हा परिषदांना शासनाने दिले आहेत.

मानधनामध्ये दरवर्षी वेतनवाढीप्रमाणे वाढ करण्याची शिफारस करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सेविकांच्या संघटनेच्या पदाधिकाºयांचा समावेश असलेली समिती २० जुलै २०१६ च्या निर्णयान्वये स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने ९ मार्च २०१७ रोजी अहवाल दिला. त्यामध्ये सेवा समाप्तीचे वय कमीची शिफारस केली होती. त्यानुसारच वय कमी केल्याचे नव्या आदेशात म्हटले आहे. या कर्मचाºयांनी आंदोलन केले, तेव्हा १ आॅक्टोबर २०१७ पासून मानधनवाढ करण्याचे आश्वासन दिले होते. या विभागाचे बहुतांश काम आॅनलाईन केले आहे; परंतु सुरुवातीस ज्या महिला कामावर लागल्या त्यांना संगणकीय माहिती करून घेण्यात अडचण येत होती. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.भाऊबीज भेट मिळते एक हजारचमध्यंतरी जेव्हा राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी संप केला तेव्हा सरकारने भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये द्यायचे मान्य केले; परंतु त्यातील एक हजार रुपयेच मंजूर केले आहेत. शासनाने तेवढेच मंजूर केल्यामुळे तेवढेच दिल्याचे कार्यालयातून सांगण्यात येते. म्हणजे तिथेही सरकारने ठेंगा दिला आहे. 

राज्य शासनाने आमच्याशी मखलाशी केली आहे. आंदोलनाची दखल म्हणून मानधनवाढ केली आणि दुसºया बाजूला सेविकांची नोकरीही काढून घेतली. ज्या महिलांनी १०० रुपये मानधनावर काम केले, त्यांना नव्या मानधनवाढीचा लाभ तर होणारच नाही; परंतु त्यांची सेवाच संपुष्टात येत आहे. याविरोधात आम्ही पुन्हा आंदोलनाची हाक देणार असून, त्यासाठी आजच मुंबईत बैठक सुरू आहे. - सुवर्णा तळेकर, जनरल सेके्रटरीमहाराष्ट्र राज्य पूर्वप्राथमिक सेविका व अंगणवाडी कर्मचारी महासंघ