शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी हलवली अन् ‘बार’ची सोय केली : कोंडिग्रेत शिक्षणापेक्षा दारूला महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:06 IST

सर्वत्र दारूबंदीसाठी पावले उचलली जात आहेत. शिक्षणासाठी अनेक सोयी-सुविधा उभारून नव्या पिढीला ज्ञानदानाची दालने खुली करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असतानाच बीअर

ठळक मुद्देअंगणवाडी बालकांची होणार ससेहोलपट; बारमालकाने केले सर्वांना ‘थंड’

घन:शाम कुंभार।यड्राव : सर्वत्र दारूबंदीसाठी पावले उचलली जात आहेत. शिक्षणासाठी अनेक सोयी-सुविधा उभारून नव्या पिढीला ज्ञानदानाची दालने खुली करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असतानाच बीअर बारला अडचण ठरणारी अंगणवाडी हलविण्यात आली. हलविण्यात आलेली अंगणवाडी दीड किलोमीटर अंतरावर असल्याने बालकांची ससेहोलपट होणार आहे. कोंडिग्रेने शिक्षणापेक्षा दारूला महत्त्व असल्याचे स्पष्ट केले.

कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथे पार्वती औद्योगिक वसाहतीनजीक अंगणवाडी क्र. २८१ ही १५ आॅगस्ट २००३ पासून सुरू आहे. यामुळे परिसरातील कामगार वस्ती व मळे भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन खुले झाल्याने त्यांचा बालमनोविकास होत आहे. यामुळे या अंगणवाडीबाबत अद्याप कोणाचीही तक्रार नव्हती.

अंगणवाडीजवळच मोकळ्या शेडमध्ये बीअर बार सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याकरिता बारमालकांकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह इतरांच्यावर विविध प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सुरू असल्याची चर्चा अंगणवाडी परिसरात आहे. सध्या सर्वत्र सुटीचा हंगाम असल्याने बालकांसह पालक परगावी गेले आहेत. अंगणवाडीत विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे. याचा फायदा घेऊन सध्याच्या ठिकाणापासून अंदाजे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाजवळील उपलब्ध असलेल्या जागेत अंगणवाडी क्र. २८१ हलविण्यात आली आहे.

अंगणवाडीतील मुले लहान असल्याने त्यांना शारीरिक त्रास होऊ नये व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या भावनेतून शासन वस्तीपासून जवळच त्यांची शिक्षणाची सोय करते; परंतु बीअर बार सुरू होण्यासाठी याठिकाणची अंगणवाडी हलवून दीड किलोमीटर अंतरावर ती सुरू केल्याने बालकांना शारीरिक त्रास सहन करावा लागणार आहे. एवढा त्रास सहन करून पालक त्यांना पाठवतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.आंदोलनाचा पवित्राबीअर बारसाठी अंगणवाडी हलवली असल्याने कोंडिग्रेने शिक्षणापेक्षा दारूला महत्त्व दिले आहे. हे सर्व करीत असताना बारमालकाने सर्वांना ‘थंड’ केले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासन दरबारी कोण लक्ष घालणार व सामाजिक संघटना का गप्प बसल्या? असा सवालही उपस्थित होत आहे. आहे त्या ठिकाणी अंगणवाडी सुरू व्हावी व बीअर बार सुरू होऊ नये यासाठी काही मंडळी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.सेविका सरस्वती भागाडे यांनी परस्पर अंगणवाडी क्र. २८१ हलविली आहे. त्यांच्यावर कारवाई करणार आहोतच. याबाबत कोंडिग्रेचे सरपंच पेटारे यांना विचारले असता, मी सरपंच आहे, कोठे अंगणवाडी भरवायची ते मी ठरवणार, असे सांगितल्याचे शिरोळच्या प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी छाया कोहाडे यांनी स्पष्ट केले. 

हेरवाडे मळा, खिलारे मळा, सुलतानपुरे मळा येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीमध्ये अंगणवाडी क्र. २८१ भरविण्यात येत आहे. त्या भागातील मुलांना अंगणवाडीत घेऊन येण्याची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाºयांची आहे.- प्रदीप पेटारे,कोंडिग्रे सरपंच

टॅग्स :SchoolशाळाMONEYपैसा