शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

Kolhapur News: मी चांगला मुलगा, बाप होऊ शकत नाही, डॉक्टरने दवाखान्यातच संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 11:27 IST

कोरोनाच्या काळात केली होती उल्लेखनीय कामगिरी

मुरगूड : मुरगूड आणि यमगे येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर महेश रामचंद्र तेलवेकर (वय ४०) मूळ गाव नानीबाई चिखली यांनी मुरगूड येथील स्वतःच्या दवाखान्यात आत्महत्या केली. नैराश्यातून त्यांनी गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्याजवळ आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून, त्याद्वारे मुरगूड पोलिस अधिक तपास करत आहेत.महेश हे गेले दहा वर्षे यमगे या गावामध्ये वैद्यकीय व्यवसाय करत होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी मुरगूड येथे एसटी स्टॅण्ड परिसरात ‘ओम क्लिनिक’ नावाने दवाखाना सुरू केला होता. तिथेही ते वैद्यकीय व्यवसाय करत होते. आपल्या कुटुंबासह ते मुरगूडमध्येच राहत होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी बीएचएमएस शिक्षण घेऊन येथपर्यंत मजल मारली होती. कोरोनाच्या काळात यमगे गावात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत होते.आज रंगपंचमी असल्याने मुरगूडमध्ये दुपारी ते आपल्या दवाखान्यात गेले. गर्दी नसल्याने त्यांनी आतील खोलीतील तुळईला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. गळफास घेण्याअगोदर त्यांनी आपल्या नातेवाइकांना फोनवरून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले, पण ते घटनास्थळी येईपर्यंत महेशने आत्महत्या केली होती. सायंकाळी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून, मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. रात्री नानीबाई चिखली येथे त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे आईवडील, पत्नी, दोन मुले, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.कोणास जबाबदार धरू नयेदरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मी चांगला मुलगा होऊ शकत नाही, मी चांगला बाप होऊ शकत नाही, मी कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, तसेच मी काही कंपन्यांमध्ये पैसे गुंतविले आहेत. माझ्या आत्महत्येस कोणास जबाबदार धरू नये, असा मजकूर लिहिला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdoctorडॉक्टर