...अन् चालकाविना धावली एस. टी. बस

By Admin | Updated: August 18, 2014 23:25 IST2014-08-18T22:15:36+5:302014-08-18T23:25:18+5:30

चालकाची समयसूचकता कामी आली आणि सगळा अनर्थ टळला.

... and ran without the driver S. T. Just the bus | ...अन् चालकाविना धावली एस. टी. बस

...अन् चालकाविना धावली एस. टी. बस

साळवण : संभाजीनगर आगाराची बस तिसंगी थांब्यावर चालकाविना पुढे गेल्याने प्रवाशांचा थरकाप उडाला आणि एकच आरडाओरडा सुरू झाला. ही घटना रविवारी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी, संभाजीनगर आगाराची कोदे मुक्कामी जाणारी बस तिसंगी थांब्यावर येऊन थांबली. तिसंगीतील प्रवासी गाडीतून खाली उतरले चालकाने गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला; मात्र स्टार्टर अडकल्यामुळे गाडी चालू झाली नाही. चालकाने खाली उतरून संबंधितांना भ्रमणध्वनीवरून दुरुस्तीसाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. इतक्यात गाडी अचानक चालू झाली व पुढे जाऊ लागली. चालकाविना पुढे जाणारी गाडी पाहताच गाडीतील प्रवाशांचा थरकाप उडाला आणि एकच आरडाओरडा सुरू झाला.
चालकाने प्रसंगावधान राखून धाडसाने चालकाकडील बाजूचा दरवाजा उघडून आत प्रवेश करून गाडी थांबविली आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका टपरीकडे सरकू लागली होती. टपरीपुढे ठोकरून गाडी रस्त्याकडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळून जीवित व वित्तहानी झाली असती. टपरीशेजारी लावलेल्या नवीन दुचाकींची काही प्रमाणात मोडतोड झाली. चालकाची समयसूचकता कामी आली आणि सगळा अनर्थ टळला. (वार्ताहर)

Web Title: ... and ran without the driver S. T. Just the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.