कुटुंबाला सावरण्यासाठी चाललेली ‘अनवश’ची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:17 IST2021-07-08T04:17:22+5:302021-07-08T04:17:22+5:30
रविवारची सुटी ‘अनवश’साठी काळ ठरली. गोव्यातील उत्तोरडा बीचवर रविवारी अनवश बुडाला. त्याच्यावर हलकर्णीत अंत्यसंस्कार झाले. जबाबदारीची जाणीव ठेवून आपल्या ...

कुटुंबाला सावरण्यासाठी चाललेली ‘अनवश’ची धडपड
रविवारची सुटी ‘अनवश’साठी काळ ठरली. गोव्यातील उत्तोरडा बीचवर रविवारी अनवश बुडाला. त्याच्यावर हलकर्णीत अंत्यसंस्कार झाले.
जबाबदारीची जाणीव ठेवून आपल्या परिवाराला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी चाललेली त्याची धडपड अखेर थंडावली. तसं पहायला गेल्यास शौकत ताशिलदार यांच्या नशिबी साडेसाती कायमच आहे. दोन वर्षांपूर्वी ट्रकचा अपघात झाला होता. सुदैवाने ते बचावले, त्यात त्यांना सहा महिने अंथरुणावर काढावे, लागले होते.
पत्नी गेल्या चार वर्षांपासून आजाराशी झुंजत आहे. त्यामुळे अनवश याच्यावर कुटुंबाची मोठी जबाबदारी होती. वयस्कर आजी-आजोबांनाही हा धक्का सहन करण्याच्या पलीकडचा होता. त्यामुळे रविवारी (दि. ४) संध्याकाळी घडलेल्या या घटनेची माहिती मंगळवार (दि. ६) पर्यंत घरी देण्यात आली नव्हती.
मात्र, पार्थिव आणल्यानंतर कुटुंबीयासह नातेवाइकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.
यांनी केले सहकार्य...
ज्या ठिकाणी अनवश बुडाला तो समुद्रकिनारा ३० किलोमीटर आहे. याठिकाणी हलकर्णीहून गेलेल्यांना ‘सर्व्हिंग ह्युमिनिटी’ या संस्थेचे अध्यक्ष अब्दुल शेख व उपाध्यक्ष उमर फारूक यांच्या ५० जणांच्या टीमने मोठे सहकार्य केले. त्यामुळे ‘अनवश’सह त्याच्या मित्राचा मृतदेह मिळून आला तर अनवशसाठी हलकर्णीहून गेलेल्या नातेवाइकांना मानसिक आधार देत त्यांची सर्व सोय करीत, शवविच्छेदन व मृतदेह गावापर्यंत पोहोचविण्याची सोयदेखील केली.
५० जणांच्या टीमने तीन दिवस ३० किलोमीटरचा परिसर एकमेकांच्या संपर्कात राहून काम करीत असल्याने आम्हाला अनवश मृतदेह सापडल्याची माहिती फयाज ताशिलदार यांनी ‘लोकमत’ला दिली.
---------------------
अनवश ताशिलदार : ०७०७२०२१-गड-०५