आनंदराव नलवडे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:24 IST2021-05-21T04:24:33+5:302021-05-21T04:24:33+5:30

मडीलगे बुद्रूक, ता भुदरगड येथील अनके सहकारी संस्थांचे संस्थापक अध्यक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष आनंदराव दिनकरराव नलवडे(वय ८२) ...

Anandrao Nalwade passed away | आनंदराव नलवडे निधन

आनंदराव नलवडे निधन

मडीलगे बुद्रूक, ता भुदरगड येथील अनके सहकारी संस्थांचे संस्थापक अध्यक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष आनंदराव दिनकरराव नलवडे(वय ८२) यांचे निधन झाले.

राष्ट्रीय काँग्रेसचे पंधरा वर्षे तालुकाध्यक्ष तर चार वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

त्यांनी येथील श्रीराम दूध संस्था, दिनकरराव नलवडे पत संस्था,राम ग्राहक भांडार या संस्थेचे संस्थापक तर वाकी येथील सह्याद्री सेवा संस्थेचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. काळम्मावाडी धरणग्रस्त चळवळीत सक्रियपणे काम केले आहे. वाळवे येथील प्रतिभा गर्ल्स हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष होते. शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते.

त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो

२० आनंदराव नलवडे

Web Title: Anandrao Nalwade passed away