पीक स्पर्धेत आनंदा मसूरकर प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:40+5:302021-07-03T04:16:40+5:30
हातकणंगले पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी यांच्यावतीने २०२०/२१ वर्षाकरिता तालुकास्तरीय पीक स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये येथील ...

पीक स्पर्धेत आनंदा मसूरकर प्रथम
हातकणंगले पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी यांच्यावतीने २०२०/२१ वर्षाकरिता तालुकास्तरीय पीक स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये येथील अलाटवाडीचे शेतकरी आनंदा हरिभाऊ मसूरकर यांनी सहभाग घेत सोयाबीनचे हेक्टरी ३५ क्विंटल ७१ किलोचे उच्चांकी उत्पादनासह प्रथम क्रमांक मिळवला. कृषी दिनाच्या कार्यक्रमात त्यांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सभापती डॉ. प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, कृषी अधिकारी गडदे, जिल्हा परिषद सदस्या पुष्पा आळतेकर, पट्टणकोडोलीचे माजी उपसरपंच कृष्णात मसूरकर व शेतकरी उपस्थित होते.
०२ पट्टणकोडोली पीक स्पर्धा
फोटो ओळ : हातकणंगले पंचायत समितीच्या कृषी विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या तालुका पातळी पीक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.