आनंद पाटील यूपीएससी परीक्षेत ३२५ वा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:26 IST2021-09-26T04:26:21+5:302021-09-26T04:26:21+5:30
गारगोटी : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२० मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत दारवाड, ता. भुदरगड येथील आनंद अशोक पाटील हा ...

आनंद पाटील यूपीएससी परीक्षेत ३२५ वा
गारगोटी : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२० मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत दारवाड, ता. भुदरगड येथील आनंद अशोक पाटील हा देशामध्ये ३२५ आला आहे.
आनंदला तिसऱ्या वर्षी दोन्ही डोळ्यांचा मोतीबिंदू झाला. त्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करावी लागली. तीन वर्षांपासूनच त्याला अल्प दृष्टी आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण येथील गारगोटी येथील नूतन मराठी शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण आंबोली येथील डायनॅमिक इंग्लिश पब्लिक स्कूलमध्ये झाले आहे. येथील मौनी विद्यापीठाच्या आयसीआरईमध्ये त्याने सिव्हील इंजिनिअरिंग डिप्लोमा केला, तर इस्लामपूर येथील आर. आय. टी. कॉलेजातून २०१७ मध्ये बीटेक डिग्री मिळवली आहे. २०१८ ला त्याने यूपीएससीची मुख्य परीक्षा पास केली. मात्र, मुलाखतीमध्ये त्यास यश आले नाही. पुन्हा २०१९ मध्येही त्यास यश आले नाही. तरीदेखील अपयशाने खचून न जाता पुन्हा त्याने खडतर परिश्रम घेऊन जानेवारी २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. ३ ऑगस्ट रोजी त्याची मुलाखत झाली. या परीक्षेचा शनिवारी निकाल लागला. तो देशामध्ये ३२५व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे .
फोटो मेलवर दिला आहे