शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रविकांत तुपकर यांना १५ ऑगस्टपर्यंत मुदत, स्वाभिमानीची पुण्यात झाली बैठक; तुपकर म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 14:20 IST

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांना १५ ऑगस्टपर्यंत शिस्तपालन समितीसमोर येऊन बाजू मांडण्याची संधी देण्यात ...

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांना १५ ऑगस्टपर्यंत शिस्तपालन समितीसमोर येऊन बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. पक्षाच्या शिस्तपालन समितीची बैठक मंगळवारी पुण्यात झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. स्वाभिमानीचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. गेल्या काही दिवसांपासून रविकांत तुपकर हे पक्षनेतृत्वावर उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी स्वाभिमानीच्या शिस्तपालन समितीने मंगळवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला रविकांत तुपकर यांना उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र, तुपकर बैठकीकडे फिरकले नाहीत. त्यामुळे शिस्तपालन समितीने त्यांना १५ ऑगस्टपर्यंत म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. जर या मुदतीत तुपकर यांनी त्यांची बाजू मांडली नाही तर पक्ष पुढील निर्णय घेणार असल्याचे समितीच्यावतीने सांगण्यात आले.बाहेर पडण्याच्या निव्वळ अफवापुण्यातील बैठकीत काय निर्णय झाला याची माहिती मला नाही, म्हणणे मांडण्याचा निरोप पक्षाच्या कार्यालयाकडून आलेला नाही. असा काही निरोप आला तर पाहू. पण, मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच राहणार आहे, पक्ष सोडण्याच्या या निव्वळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण रविकांत तुपकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिले. मी माझे म्हणणे गेल्या पाच वर्षांपासून राजू शेट्टी यांच्याजवळ मांडत आलो आहे. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष प्रा. पोपळे, सावकार मादनाईक यांच्याशीही माझ्या तक्रारी मी मांडल्या असल्याचे तुपकर यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbuldhanaबुलडाणाRavikant Tupkarरविकांत तुपकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना