शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श, शेतात गेलेल्या वृध्द महिलेचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 17:03 IST

दिंडनेर्ली : तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन दिंडनेर्ली(ता.करवीर) येथे शेतात भांगलणी साठी गेलेल्या वृध्द महिलेचा विजेचा शॉक लागून जागीच ...

दिंडनेर्ली : तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन दिंडनेर्ली(ता.करवीर) येथे शेतात भांगलणी साठी गेलेल्या वृध्द महिलेचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. गंगुबाई दत्तात्रय वाडकर (वय ६४, रा. हणबरवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. इस्पूर्ली पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, गंगुबाई वाडकर या दिंडनेर्ली येथील जावई साताप्पा पाटील यांना शेती कामात मदत करण्यासाठी आल्या होत्या. आज, सकाळीच्या सुमारास त्या बांबर नावाच्या शेतात भात भांगलण करण्यासाठी एकट्या पुढे गेल्या होत्या. काल, मंगळवारी रात्री जोरात पाऊस पडल्याने शेतातील विद्युत पुरवठा करणारी तार तुटून भातात पडली होती. गंगुबाई यांच्या पायांना या तारेचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.काही वेळाने एका शेतकऱ्याला वृध्द महिला शेतात निपचीत पडल्याचे दिसले. संबंधित त्या महिलेला उठवायला जाणार इतक्यात त्याला विद्युत तारा तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्या. तेव्हा त्याने तात्काळ विद्युत पुरवठा बंद करण्यास सांगितले व त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली. घटनास्थळी दिंडनेर्ली व हणबरवाडी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.घटनास्थळी महावितरणचे अभियंता सुभाष पाटील तसेच कर्मचारी, इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह सी.पी.आर.कडे पाठविण्यात आला. गंगुबाई यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectricityवीजDeathमृत्यू