शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- दूधगंगा प्रकल्प: मान्यतेआधीच ४० कोटी दिल्याची चौकशी रखडली

By समीर देशपांडे | Updated: December 28, 2023 13:53 IST

आतापर्यंत पाच हजार कागद चौकशी समितीकडे

समीर देशपांडेकोल्हापूर : दूधगंगा (काळम्मावाडी) जलसिंचन प्रकल्पाच्या १६२ कोटींच्या डाव्या कालव्याच्या कामात मान्यतेविनाच ठेकेदाराला ४० कोटी रुपये अदा केल्याप्रकरणाची चौकशी पाच महिने झाले तरी अजूनही सुरूच आहे. समितीचे अध्यक्ष जळगाव येथून हे चौकशीचे काम पाहत असून, कोल्हापूरमधून आतापर्यंत पाच हजारहून अधिक कागद चौकशीकामी मागवून घेण्यात आली आहेत. प्रत्यक्षात चौकशी समितीचे अध्यक्ष अणि समिती या कामी अजूनही कोल्हापूरला आलेली नाही.आमदार प्रकाश आबिटकर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून याबाबतचा मुद्दा मुंबईतील विधानसभा अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकारी अभियंता विनया बदामी यांच्या निलंबनाची घोषणा केली होती. दूधगंगा प्रकल्पाचा डावा कालवा ७६ किलोमीटरचा आहे. यातील ३२ ते ७६ किमी कालव्याच्या कामात कंत्राटदार आणि कार्यकारी अभियंता यांच्या संगनमताने अनियमितता झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी दक्षता पथक, पुणे यांचा प्राथमिक अहवाल ७ ऑगस्ट २०२० रोजी सरकारला प्राप्त झाला. या प्रकरणात अनियमितता आणि अधिकचा निधी दिल्याचे सिद्ध झाले. तांत्रिक मान्यता घेऊनच याचे बिल अदा करण्याची अट दुर्लक्षित करून ठेकेदाराला ४० कोटी रुपये अदा केल्याने संबंधित कार्यकारी अभियंता यांचे निलंबन करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्य अभियंता बोरकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यांना एका महिन्यात अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले होते.

आधीच प्रकरण जुनेआधीच हे प्रकरण जुने आहे. अशात चौकशीलाही विलंब होत आहे. कागदपत्रे मागवून घेण्यापेक्षा चौकशी समितीच कोल्हापुरात आली असती तर अहवाल लवकर झाला असता. परंतु, या चौकशी समितीला मुदतवाढ दिली आहे की नाही हे देखील स्पष्ट झालेले नाही.

बदामी यांच्या निलंबनाबाबत..विनया बदामी यांनी निलंबनाविरोधात ‘मॅट’मध्ये धाव घेतली होती. यावर सुनावण्या होऊन याबाबतचा निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील पुनरावलोकन समितीने घ्यावा, असे आदेश ‘मॅट’ने दिले आहेत. त्यानुसार आता २ जानेवारी २०२४ रोजी याबाबत बैठक होणार आहे.

या प्रकरणी अंतरिम अहवाल दिला आहे. अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. चौकशी समिती कोल्हापूरला येणार का किंवा कसे, याबाबत मी फारसे सांगू शकणार नाही. - ज. द. बोरकर, चौकशी समितीचे अध्यक्ष, मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरण