शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

Kolhapur: मोजणीसाठी आले अन् ठेच लागून विहिरीत पडले, भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 11:15 IST

दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला

हातकणगले : रुई (ता. हातकणंगले) येथे शेतजमीन मोजणी करण्यासाठी गेलेले भूमी अभिलेखचे कर्मचारी राजेंद्र रामचंद्र कोळी (वय ४५ रा.आष्टा ता.वाळवा) यांचा विहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रुई येथे गावालगतच गडकरी यांची विहीर आहे. गट नंबर ३३९च्या शेतजमीन मोजणीसाठी हातकणंगले येथील भूमीअभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले होते. जमिनीच्या हद्दीची खातरजमा समजून घेण्यासाठी कर्मचारी पायवाटेने जात असताना राजेंद्र कोळी यांना ठेच लागली. त्यांचा तोल जाऊन ते विहिरीच्या दगडी कठड्यावर कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागून ते बेशुद्ध पडले. जखमी झाल्याने ते सुमारे ५० फूट खोल पाण्यात पडले. विहिरीत पाणी आणि गाळ मोठ्या प्रमाणात असल्याने, शोधमोहिमेला अडचण येत होती. पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी विहिरीत उतरून शोधण्याचा प्रयत्न केला. दोन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह सापडला. मृतदेहाची उतरिय तपासणी हातकणंगले ग्रामिण रुग्णालयामध्ये करण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर