शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आता दिवसातून दोनवेळा कोल्हापुरातून मुंबईला विमान? नामांकित कंपनीकडून प्रस्ताव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 12:17 IST

कोल्हापूर : कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्यांची वाढती संख्या पाहता कोल्हापुरातून मुंबईला दिवसातून दोनवेळा विमानसेवा सुरू करण्यासाठी देशातील एका नामांकित विमान ...

कोल्हापूर : कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्यांची वाढती संख्या पाहता कोल्हापुरातून मुंबईला दिवसातून दोनवेळा विमानसेवा सुरू करण्यासाठी देशातील एका नामांकित विमान कंपनीने तयारी दर्शविली असून, लवकरच हा प्रस्ताव ही कंपनी विमानतळ प्राधिकरणाला पाठवणार आहे. हा प्रस्ताव मान्य झाला तर कोल्हापूरकरांची मोठी सोय होणार आहे.सध्या कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी विमानसेवा सुरू आहे. मात्र, त्याची वेळ तितकीशी सोयीची नाही. एका दिवसात मुंबईला जाऊन काम संपवून पुन्हा त्याच विमानाने परत येणे शक्य होत नाही. ही नामांकित विमान कंपनी सकाळी व सायंकाळी अशी दोनवेळा सेवा सुरू करण्याच्या विचाराधीन आहे.

दिवसातून दोनवेळा मुंबईला जाण्यासाठी विमान असेल तर येथील उद्योजक, व्यावसायिक यांना सकाळच्या विमानाने मुंबईला जाऊन काम आटोपून पुन्हा रात्री कोल्हापुरात येता येणार आहे. विशेष म्हणजे हीच कंपनी एअरबस विमानसेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. हे एअरबस विमान १८५ प्रवासी क्षमतेचे असून, त्याचा वेगही प्रचंड असतो. ही सेवा सुरू झाल्यास तिकीटदरही कमी होणार आहेत.

मुंबई, पुण्याची विमाने पार्किंगसाठी कोल्हापुरातमुंबई, पुण्यातील विमानतळे नेहमीच प्रचंड व्यस्त असतात. त्यामुळे खासगी विमाने कुठे पार्क करायची ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळावर ही खासगी विमाने पार्क करता येतील का याची चाचपणी वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाला आणखी जमीन संपादित करावी लागणार आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर विमानतळ प्राधिकरणाला पार्किंगच्या भाडे रूपात मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल. शिवाय खासगी विमानांच्या पार्किंगचा प्रश्नही निकालात निघेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरairplaneविमानMumbaiमुंबई