अमृता पाटीलचे दहावीत १०० टक्के गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:15+5:302021-07-19T04:16:15+5:30
कोल्हापूर : रयत शिक्षण संस्थेचे रामचंद्र बाबुराव पाटील विद्यालय, सडोली खालसाची विद्यार्थिनी अमृता साताप्पा पाटील हिने दहावीमध्ये १०० टक्के ...

अमृता पाटीलचे दहावीत १०० टक्के गुण
कोल्हापूर : रयत शिक्षण संस्थेचे रामचंद्र बाबुराव पाटील विद्यालय, सडोली खालसाची विद्यार्थिनी अमृता साताप्पा पाटील हिने दहावीमध्ये १०० टक्के गुण संपादन केले. त्याचबरोबर मृणाली जोतिराम पाटील हिने ९८.८० टक्के तर आकांक्षा सुरेश पाटील हिने ९८.४० टक्के गुण मिळवत शाळेत दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. शाळेतून १३२ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते, हे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुणवंताचा सत्कार मुख्याध्यापक आर. बी. नेर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक व्ही. बी. साठे, शिक्षक नेते एस. व्ही. पाटील आदी उपस्थित होते. संस्थेचे जनरल बॉडी सदस्य, माजी आमदार संपतराव पवार, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य भगतसिंग पवार-पाटील, बाळासाहेब साळोखे यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
फोटो ओळी : रयत शिक्षण संस्थेच्या सडोली खालसा (ता. करवीर) येथील रा. बा. पाटील हायस्कूलमध्ये दहावी परीक्षेत अमृता पाटील, मृणाली पाटील व आकांक्षा पाटील यांनी गुणानुक्रमे क्रमांक पटकावले. (फोटो-१८०७२०२१-कोल - सडोली खालसा)