संस्थेतील ठेवींची रक्कम म्हणजे लोकांचा विश्वास;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:30 IST2021-09-17T04:30:27+5:302021-09-17T04:30:27+5:30

कोतोली येथे जय जनसेवा निधी बँकेचे उद्धाटन सोपान पाटील : कोतोली येथे जय जनसेवा निधी बँकेचे उद्धाटन लोकमत न्यूज ...

The amount of deposits in an institution is the trust of the people; | संस्थेतील ठेवींची रक्कम म्हणजे लोकांचा विश्वास;

संस्थेतील ठेवींची रक्कम म्हणजे लोकांचा विश्वास;

कोतोली येथे जय जनसेवा निधी बँकेचे उद्धाटन

सोपान पाटील : कोतोली येथे जय जनसेवा निधी बँकेचे उद्धाटन

लोकमत न्यूज नेटवर्क

करंजफेण : सहकारी संस्थेकडे लोक आयुष्यभर मिळविलेली पूंजी विश्वासाने ठेवतात. लोक ठेवीच्या रूपाने संस्थेत ठेवत असलेला पैसा म्हणजे तो खऱ्याअर्थाने लोकांनी संस्थेवर ठेवलेला विश्वास असतो. त्यामुळे संस्थेचा कारभार चालवत असताना ठेवीदारांच्या विश्वासाला तडा जाता कामा नये, ही काळजी संस्था चालकांनी घेण्याची गरज असल्याचे मत उद्योगपती सोपान पाटील यांनी कोतोली (ता. पन्हाळा) येथील जय जनसेवा निधी बँकेच्या उद्धाटनप्रसंगी व्यक्त केले.

सामाजिक कार्यातून लोकांच्या सेवेत नेहमी अग्रेसर असलेल्या जनसेवा समुदायाने लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी संस्था सुरू केली असल्याचे संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सागर वरपे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. हरिषचंद्र खाडे होते. यावेळी सरपंच पी. एम. पाटील, उपसरपंच राजेंद्र लव्हटे, उपाध्यक्ष संभाजी सुतार, श्यामराव वरपे, तुळशीदास घोलपे, बबन कांबळे, विजय पाटील, दीपक कांबळे, संदीप चौगले, संजय पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: The amount of deposits in an institution is the trust of the people;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.