शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: भाच्याला फोन करून घेतली नदीत उडी, कारण अस्पष्ट; पोलिसांकडून शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:44 IST

मोबाइल रस्त्याकडील बाजूला टाकून जोरात आरोळी ठोकून पुराच्या पाण्यात उडी घेतली

गारगोटी : देवकेवाडी (ता. भुदरगड) येथील अमित तानाजी रोकडे (वय २७) या तरुणाने भाच्याला फोन करून मडिलगे बुद्रुक येथील वेदगंगा नदीच्या पुलावरून उडी मारल्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला. भुदरगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. पण अंधार असल्याने काही करता आले नाही. काल, रविवारी पुन्हा गारगोटीचे पोलिस आणि आपत्कालीन सेवा पथक अमितचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, तो सापडला नाही.शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास गारगोटी-कोल्हापूर मार्गावरील मडिलगे बुद्रुक येथील वेदगंगा नदीच्या पुलाच्या कठड्यावर पलीकडे अमित उभा होता. त्यावेळी तेथून निघालेल्या दोघांना तो लोखंडी संरक्षक कठड्याच्या पलीकडे उभा असलेला दिसला. त्यांनी त्याला हटकले असता अमितने मोबाइल रस्त्याकडील बाजूला टाकून जोरात आरोळी ठोकून पुराच्या पाण्यात उडी घेतली. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. उडी मारण्यापूर्वी अमितने मी मडिलगे येथील नदीत उडी मारणार असल्याचा फोन भाचा सुरज वाईंगडे याला केला होता. दरम्यान, अमितच्या फोनवर सुरज वाईंगडेचा फोन आला. त्यावेळी त्याने अमितने नदीत उडी मारल्याचे सांगितले. ही घटना समजताच पोलिस निरीक्षक किरण लोंढे, पोलिस उपनिरीक्षक जीवन पाटील, पोलिस उपनिरीक्षक शेख, पोलिस पाटील युवराज धोंगडे, अनिल गुरव घटनास्थळी आले. पूर आणि अंधार असल्याने काहीही करता येत नव्हते. त्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासून गारगोटीचे पोलिस आणि आपत्कालीन सेवा पथक अमितचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. संध्याकाळपर्यंत तो सापडला नाही.