शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एएस ट्रेडर्स फसवणुकीतील मोठा मासा लागला पोलिसांच्या गळाला, गुंतवणूकदारांना सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा गंडा

By उद्धव गोडसे | Updated: August 17, 2023 12:19 IST

आज न्यायालयात हजर करणार

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला एएस ट्रेडर्सचा संचालक अमित अरुण शिंदे अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्या पथकाने गुरुवारी (दि. १७) सकाळी शिंदे याला जेरबंद केले.कमी कालावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा गंडा घातल्याबद्दल एएस ट्रेडर्स कंपनीसह २७ संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यातील विक्रम जोतिराम नाळे, सुवर्णा श्रीरंग सरनाईक, बाळासो कृष्णात धनगर आणि बाबासो भूपाल धनगर या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. आता या गुन्ह्यातील पाचवा संशयित अमित शिंदे याला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी सकाळी शहरातून अटक केली. तो कंपनीचा संचालक होता. तसेच गुंतवणूक वाढवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. त्याला आज, गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याच्या अटकेमुळे या गुन्ह्यातील महत्त्वाची माहिती, कागदपत्रे हाती लागतील, असा विश्वास तपास अधिकारी स्वाती गायकवाड यांनी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस