शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मिरवणुकीच्या धामधुमीत हळूच सटकले अन् वृद्धेला लुटून गोबर गॅसमध्ये ढकलेले, पनोरी येथील खुनाचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 14:44 IST

कर्जबाजारीपणातून कृत्य, गावातीलच दोघांना अटक

कोल्हापूर : चैनीखोर वृत्तीतून वाढलेले कर्ज फेडण्यासाठी दोन तरुणांनी पनोरी (ता. राधानगरी) येथील वृद्धेचे दागिने लुटून तिचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले. अभिजित मारुती पाटील (व ३४) आणि कपिल भगवान पातले (३४, दोघे रा. पनोरी) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. शनिवारी (दि. ६) गावात गणेश विसर्जन मिरवणुकांची धामधूम सुरू असताना त्यांनी श्रीमंती हरी रेवडेकर (वय ७३) यांचे दागिने लुटले. डोक्यात धारदार शस्त्र मारून खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह गोबर गॅसच्या खड्ड्यात टाकला होता.पनोरी येथील विजय शंकर बरगे यांच्या गोबर गॅसच्या खड्ड्यात श्रीमंती रेवडेकर यांचा मृतदेह आढळताच परिसरात खळबळ उडाली होती. मृतदेहाच्या अंगावरील दागिने लंपास झाल्याचे लक्षात येताच चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. राधानगरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता. सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाला संशयितांची माहिती मिळाली.संशयित अभिजित पाटील आणि कपिल पातले हे दोघे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास गावातील गणेश विसर्जन मिरवणुकीतून निघून गेल्याचे समजले. चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांनी रेवडेकर यांच्या अंगावरील सहा तोळे दागिने लुटून त्यांचा खून केल्याची कबुली दिली. दोघांना अटक केली असून, पुढील तपासासाठी त्यांचा ताबा राधानगरी पोलिसांकडे देण्यात आला.महिन्यापूर्वी रचला कटकर्ज फेडण्यासाठी श्रीमंती रेवडेकर यांच्या अंगावरील दागिने लुटण्याचा कट या दोघांना महिन्यापूर्वी रचला होता. यासाठी अनंत चतुर्दशीचा दिवस निवडला. सगळे गाव मिरवणुकीत दंग असताना हे दोघे मिरवणुकीतून निघून गेले. मागील दाराने रेवडेकर यांच्या घरात प्रवेश केला. दागिने हिसकावताना विरोध केल्याने त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केला. मृत्यू झाल्याचे लक्षात येताच घरामागे असलेल्या गोबर गॅसच्या खड्ड्यात मृतदेह टाकून त्यांनी पळ काढला होता.

कर्जबाजारीपणातून कृत्यअभिजित आणि कपिल हे दोघे लहानपणापासूनचे मित्र आहेत. दोघेही विवाहित आहेत. अभिजित हा एका साखर कारखान्यात नोकरी करतो, तर कपिल शेती करतो. दोघांवर प्रत्येकी दीड ते दोन लाखांचे कर्ज आहे. वाढते कर्ज फेडण्यासाठी लूटमार करण्याचा कट रचल्याची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली.दोघांचे मोबाइल पासवर्ड सारखेचगावात दोघेही एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. दोघांची गणेश मंडळेही वेगळी आहेत. मात्र, लहानपणापासूनची मैत्री असल्यामुळे दोघांच्या मोबाइलचा पासवर्ड एकच असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एकट्या वृद्धेला केले लक्ष्यश्रीमंती रेवडेकर यांच्या पतीचे १० वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांचा मुलगा आणि सून कोल्हापुरात राहतात, तर दोन मुली विवाहित आहेत. अधूनमधून ते आईला भेटण्यासाठी जातात. एकट्या राहणाऱ्या वृद्धेला लक्ष्य करून दोघांनी लूटमार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.