कोरोना महामारीच्या काळात आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण तसेच नागरिकांना रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी निर्माण होणार्या अनंत अडचणी पाहून पाटील यांनी कृष्णशांती चॅरिटेबल फौंडेशन व वनश्री उद्योग समूहाच्या माध्यमातून स्वखर्चाने रुग्णवाहिका खरेदी केली असून, लोकांच्या सेवेत ती हजर केली आहे. कोरोनाकाळात त्यांनी रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका सुरू करून चांगले कार्य केल्याचे मत आ. कोरे यांनी व्यक्त केले. यावेळी शिक्षण क्षेत्रातून सेवानिवृत्त झाल्याबद्दल हनुमान उद्योग समूहाचे अध्यक्ष बळवंत पाटील यांचा आ. कोरे यांच्याहस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी कोतोलीचे उपसरपंच राजेंद्र लव्हटे, दगडू पाटील, डाॅ. स्नेहदीप चौगुले, प्रशांत पाटील, दिलीप पाटील, सर्जेराव पाटील, राज गंधवाले, मोरारजी सातपुते, प्रधान पाटील, डाॅ. सुभाष चौगले, आदी उपस्थित होते.
फोटो ओळ : कोतोली (ता. पन्हाळा) येथील जि. प. सदस्य शंकर पाटील यांच्या प्रेरणेतून खरेदी केलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आ. विनय कोरे यांच्याहस्ते झाला.