शिरोळ : शिरोळ तालुक्यातील शासकीय आरोग्य सेवा नेहमीच आघाडीवर राहिली आहे. कोरोना महामारीत आरोग्य विभागाने कौतुकास्पद काम केले असून, या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना मदत होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी केले.
ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्यावतीने घालवाड (ता. शिरोळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध असणारी रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. माने यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करून ती घालवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आली.
यावेळी पंचायत समितीचे सभापती कविता चौगुले, उपसभापती सचिन शिंदे, सदस्य मल्लाप्पा चौगुले, डॉ. प्रसाद दातार, डॉ. जोशी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
फोटो - २८०१२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - घालवाड (ता. शिरोळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. यावेळी मल्लाप्पा चौगुले, सचिन शिंदे, कविता चौगुले, डॉ. अशोकराव माने, डॉ. प्रसाद दातार उपस्थित होते.