‘आंबेओहोळ’ प्रश्नी संध्यादेवी कुपेकर यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:17 IST2021-06-22T04:17:23+5:302021-06-22T04:17:23+5:30

आजरा-गडहिंग्लज तालुक्याला वरदायी ठरलेल्या आंबेओहोळ प्रकल्पांची मुहूर्तमेढ स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी रोवली. स्व. कुपेकरांचे स्वप्न सत्यात उतरले. यंदापासून प्रकल्पात ...

‘Ambeohol’ question Sandhyadevi Kupekar felicitated | ‘आंबेओहोळ’ प्रश्नी संध्यादेवी कुपेकर यांचा सत्कार

‘आंबेओहोळ’ प्रश्नी संध्यादेवी कुपेकर यांचा सत्कार

आजरा-गडहिंग्लज तालुक्याला वरदायी ठरलेल्या आंबेओहोळ प्रकल्पांची मुहूर्तमेढ स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी रोवली. स्व. कुपेकरांचे स्वप्न सत्यात उतरले. यंदापासून प्रकल्पात पाणीसाठा करण्यात येत आहे. कुपेकर कुटुंबीयांचे ऋण व्यक्त करण्यासाठी उत्तूर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले.

यावेळी वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, शिरीष देसाई, मारुती घोरपडे, विजय वांगणेकर आदींची उपस्थिती होती.

फोटो ओळी :

आंबेओहोळ प्रकल्पाची सुरुवात स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी केल्यामुळे त्यांच्या सुविद्य पत्नी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांचा उत्तूर येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सत्कार केला. यावेळी वसंत धुरे, काशिनाथ तेली, मारुती घोरपडे, शिरीष देसाई आदी उपस्थित होते.

क्रमांक : २१०६२०२१-गड-०३

Web Title: ‘Ambeohol’ question Sandhyadevi Kupekar felicitated