शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

उत्सवी वातावरणासाठी आंबेडकर जयंतीचा उपयोग नको : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 12:45 IST

समाजात वैचारिक क्रांती आणण्यासाठी आंबेडकर जयंतीचा मुहूर्त साधा

कोल्हापूर : गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सामान्य माणसांबरोबरच जगभरात पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटले पाहिजे. केवळ नाचगाण्यासाठी आणि उत्सवी वातावरणासाठी उपयोग न करता समाजात वैचारिक क्रांती आणण्यासाठी आंबेडकर जयंतीचा मुहूर्त साधा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त हौसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या निर्माण चौकातील भीम महोत्सवाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. अध्यक्षस्थानी भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो होते. यावेळी भारतात होणाऱ्या सोळाव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध महोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण आठवले यांच्या हस्ते झाले.यावेळी आठवले म्हणाले की, बौद्ध समाज जरी येथे नसला तरी बुद्धांना मानणारे घराघरात आणि सार्वजनिक ठिकाणी आहेत, हीच त्यांच्या विचारांची ताकद आहे. बाबासाहेबांनी या देशात माणसांना जोडणारे माणुसकीचे कार्य केले आहे.ट्रस्टचे अध्यक्ष सतीश म्हाळगे यांनी प्रास्तविक करताना रामदास आठवले यांच्या नावे ट्रस्टमार्फत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापुरात उभारणार असल्याचे जाहीर केले. संघटक सचिव शहाजी कांबळे, सांगलीचे माजी महापौर विवेक कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी भदंत राहुल बोधी महाथेरो, आर. संबोधी, अण्णासाहेब वायदंडे, रूपाताई वायदंडे, सचिव मंगल म्हाळगे, माजी नगरसेवक दुर्वास कदम, राजेश ठिकपुर्ले, राहुल सडोलीकर उपस्थित होते. यावेळी कबीर नाईकनवरे यांनी गीतांचा कार्यक्रम सादर केला.गर्दी नसल्याने कार्यकर्त्यांना खडसावलेआठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करताना कार्यक्रमाला गर्दी नसल्याबद्दल कानउघाडणी करून कार्यकर्त्यांनाही थेट भाषणातून खडसावले. एखाद्या आंबेडकरी विचारांच्या वस्तीत जरी कार्यक्रम ठेवला असता तरी हजार लोक जमले असते, असे त्यांनी सुनावले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीRamdas Athawaleरामदास आठवले