बिद्री साखर कारखाना व सरवडेतील बुद्धविहारात आंबेडकर जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:22 IST2021-04-15T04:22:19+5:302021-04-15T04:22:19+5:30

कोरोना महामारीमुळे व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या विभागात सर्वत्र साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. विहारांमध्ये बुद्धवंदना, धम्मवंदना ...

Ambedkar Jayanti at Bidri Sugar Factory and Buddha Vihara in Sarvade | बिद्री साखर कारखाना व सरवडेतील बुद्धविहारात आंबेडकर जयंती

बिद्री साखर कारखाना व सरवडेतील बुद्धविहारात आंबेडकर जयंती

कोरोना महामारीमुळे व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या विभागात सर्वत्र साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. विहारांमध्ये बुद्धवंदना, धम्मवंदना घेण्यात आली.

कारखाना कार्यस्थळावरील कार्यक्रमास संचालक राजेंद्र पाटील, कार्यकारी संचालक आर.डी. देसाई, चीफ अकाउंट एस.एस. कुलकर्णी, लेबर ऑफिसर शिवराज मोरे, सिव्हिल इंजिनिअर बी.बी. पाटील, को-जन.चे महेश सलगर उपस्थित होते.

सरवडे येथील कार्यक्रमास बिद्री साखर कारखाना माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे, सरवडे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कुंडलिक पाटील, उद्योजक सचिन वागवेकर, शांताराम पाटील, संदीप पाटील, दिग्विजय मोरे, दिग्विजय साठे, मच्छिंद्र पवार, विजयराव कांबळे, विलास कांबळे, सीताराम कांबळे, उत्तमराव कांबळे, डॉ. योगेंद्र कांबळे, भीमराव कांबळे यांनी स्वागत केले व अविनाश कांबळे यांनी आभार मानले.

Web Title: Ambedkar Jayanti at Bidri Sugar Factory and Buddha Vihara in Sarvade