शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘अंबाबाई’ला इमिटेशन ज्वेलरीचा विळखा - :‘देवस्थान’चा दिव्याखाली अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:16 IST

अंबाबाई मंदिराबाहेरील अतिक्रमण हटविण्यात पुढाकार घेतलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिर परिसरातील दुकानदारांनी केलेल्या वाढीव अतिक्रमणांवर मात्र अद्याप कारवाईचा बडगा उगारलेला नाही.

ठळक मुद्देमंदिरातील अतिक्रमण कधी हटविणार

कोल्हापूर : अंबाबाई मंदिराबाहेरील अतिक्रमण हटविण्यात पुढाकार घेतलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिर परिसरातील दुकानदारांनी केलेल्या वाढीव अतिक्रमणांवर मात्र अद्याप कारवाईचा बडगा उगारलेला नाही. ही दुकाने पूजेच्या साहित्यांची आहेत, की खेळणी, इमिटेशन ज्वेलरीची अशी शंका निर्माण होते. भाविकांच्या विश्रांतीसाठी बनविण्यात आलेल्या या ओवऱ्या दुकानदारांना देऊन कधीकाळी समितीनेच अतिक्रमण केले आहे. याविरोधात समिती कधी पाऊल उचलणार, अशी विचारणा आता होत आहे.

अंबाबाई मंदिराभोवती असलेल्या अतिक्रमणविरोधात देवस्थान समितीच्या मागणीनुसार महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेने सलग तीन दिवस केलेल्या या कारवाईमुळे आणि फेरीवाल्यांसंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे कधी नव्हे ते महाद्वार-ताराबाई हा मार्ग भाविकांना फिरता येण्याइतपत मोकळा झाला आहे. एकीकडे बाह्य अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू असताना देवस्थान समितीचे मात्र अंतर्गत अतिक्रमणांकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. दुसरीकडे दुकानदारांनी दुकानात पूजेचे साहित्य कमी आणि इमिटेशन ज्वेलरी व तत्सम साहित्यच जास्त ठेवले आहे. ओवरीबाहेर तीन फुटांहून अधिक जागेत अतिक्रमण करून ज्वेलरी, खेळणी आणि तत्सम साहित्य भाविकांच्या डोक्यावर लटकत ठेवली आहेत.

मंदिराच्या अंतर्गत रचनेत असलेल्या ओवऱ्यांमध्ये २५ ते ३० दुकानदार आहेत. भाविकांना पूजेचे साहित्य मंदिरातच मिळावे या दृष्टिकोनातून ओवºया दिल्या असल्या, तरी त्याचे परिणाम प्रकर्षाने जाणवत आहेत. मंदिराच्या आवारात एकही जागा नाही, जिथे भाविक निवांत काहीकाळ घालवू शकतात. नवरात्रौत्सवापूर्वी समितीने दुकानदारांना ही ज्वेलरी आणि अतिक्रमण हटविण्याच्या सूचना केल्या होत्या. कारवाईही केली; पण आता जैसे थे स्थिती आहे.ओवºया भाविकांसाठी की व्यवसायासाठी...मंदिर शास्त्रानुसार देवळ्यांच्या रूपात असलेल्या ओवºया भाविकांना देवाच्या सान्निध्यात वेळ घालवता यावा, ध्यानमग्न होता यावे, येथे धार्मिक उपक्रम, कुलाचार करता यावेत व दुरून आलेल्या भाविकांना काही काळ विश्रांती मिळावी, यासाठी बांधलेल्या असतात; पण अंबाबाईचे हे एकमेव मंदिर आहे, जिथे एकही ओवरी भाविकांसाठी शिल्लक ठेवलेली नाही. येथील अर्ध्या ओवºया खासगी मंदिरांच्या मालकांकडे, अर्ध्या ओवºया देवस्थान समितीनेच ३0 वर्षांपूर्वी दुकानदारांना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे समितीचा कारभार होता तेव्हा त्यांनी परिसरातील दुकाने तातडीने हटविण्याचा निर्णय दिला होता; मात्र दुकानदारांनी त्यावर स्थगिती आणली. नंतर या प्रकरणाचे पुढे काहीच झाले नाही.बंकरमध्ये चपलांचा ढीग आणि कचराचार-पाच वर्षांपूर्वी पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या मागणीनुसार देवस्थान समितीने मंदिराच्या महाद्वार, दक्षिण दरवाजा आणि घाटी दरवाजाबाहेर बंकर बांधून दिले. आता या सगळ्या वापराविना पडून असलेल्या बंकरमध्ये पान खाऊन मारलेल्या पिचकाºया, चपला-कचºयाचे ढीग असे घाणेरडे दृश्य आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा असलेल्या महाद्वारात तर हे ओंगळवाणे प्रदर्शनच मांडले आहे.अंबाबाईच्या दक्षिणेतून एक महिन्यात एक कोटीचे उत्पन्नकोल्हापूर : मे महिन्याच्या उन्हाळी सुटीत परस्थ भाविकांनी अंबाबाई मंदिरातील दानपेटीत टाकलेल्या रकमेतून यंदा देवस्थानच्या इतिहासात प्रथमच उच्चांकी उत्पन्न मिळाले आहे. सोमवारपासून तीन दिवस मंदिराच्या दक्षिणा पेटींतील रकमेची मोजदाद करण्यात आली. त्यानुसार अंबाबाई मंदिराच्या उत्पन्नात दक्षिणेच्या माध्यमातून १ कोटी ७ लाख २९ हजार ४३० रुपयांची भर पडली आहे.अंबाबाईची महती देशभर झाल्याने नवरात्रौत्सवात २५ लाख यांसह उन्हाळी सुटी, दिवाळी, ख्रिसमस तसेच सण समारंभाच्या निमित्ताने वर्षभरात ५० ते ६० लाख भाविकांची नोंद होते.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारित असलेल्या मंदिर परिसरातील दक्षिणा पेट्या दर महिन्याला उघडल्या जातात. यापूर्वी मे महिन्याच्या सुरुवातीला दक्षिणा पेट्या रिकाम्या करण्यात आल्या होत्या. एक महिन्यानंतर सोमवारपासून गरुड मंडपात दान पेट्यांतील रकमेची मोजणी करण्यात आली. बुधवारी सायंकाळी ही मोजणी पूर्ण झाली. या मोजणीअंती समितीला प्रथमच एक कोटी ७ लाख २९ हजार ४३० इतक्या रकमेचे उच्चांकी उत्पन्न मिळाल्याचे निदर्शनास आले. आजतागायत मे महिन्यात ७० ते ८० लाखांपर्यंतची रक्कम दानपेटीत जमा होत होती. यंदा प्रथमच एक कोटीचा आकडा पार झाला आहे.तीन दिवसांतील मोजदाद अशीसोमवार : ३४ लाख ५८ हजार ०९४मंगळवार : ४३ लाख ३७ हजार ८०४बुधवार : २९ लाख ३३ हजार ५३२ 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका