शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिराचा होणार जीर्णोद्धार, तीन कोटींची तरतूद : देवस्थान समितीचे बजेट मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 13:55 IST

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या यंदाच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अंबाबाई मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तीन कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय जोतिबा मंदिर जीर्णोद्धार, अंबाबाई भाविकांसाठी भक्त निवास, अन्नछत्र, नव्या इमारतीची बांधणी असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

ठळक मुद्देअंबाबाई मंदिराचा होणार जीर्णोद्धार, तीन कोटींची तरतूद देवस्थान समितीचे बजेट मंजूर

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या यंदाच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अंबाबाई मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तीन कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय जोतिबा मंदिर जीर्णोद्धार, अंबाबाई भाविकांसाठी भक्त निवास, अन्नछत्र, नव्या इमारतीची बांधणी असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या चार दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत नव्या वर्षातील विविध उपक्रमांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली. अंबाबाई मंदिराच्या बांधणीचे दगड निखळणे, भग्न होत असलेल्या शिळा, दगडी बांधकामावर लावण्यात आलेला काळा रंग, आॅईल पेंटिंग, ठिकठिकाणी लोखंडी रेलिंग यासह मंदिराच्या दगडी बांधकामाचे जतन व संवर्धन हा विषय यंदा देवस्थान समितीच्या मुख्य विषयपत्रिकेवर आहे. त्यासाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.सध्या जोतिबा मंदिर विकास आराखडा राबविण्यात येत आहे. दुसरीकडे, देवस्थान समितीनेही मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी १२ कोटींचा निधी राखीव ठेवला आहे. नृसिंहवाडी येथे देवस्थान समितीची जागा आहे; तेथेही भक्त निवास बांधण्यात येणार आहे.याशिवाय ताराबाई रोडवरील निंबाळकर यांची जागा खरेदी करण्याचा रखडलेला प्रस्ताव मार्गी लावून तेथे भाविकांसाठी भक्त निवास व अन्नछत्र उभारण्यात येणार आहे. यापूर्वीच्या समिती कार्यकारिणीने महालक्ष्मी बँकेची जागा खरेदी केली आहे. या जागेवर समितीचे कार्यालय उभारण्यात येणार आहे.

मंदिराच्या परिसरात कारंजामागे देवस्थान समितीची इमारत आहे. या ठिकाणी भाविकांच्या सोईसुविधांसाठी नवी इमारत उभारण्याचा विचार आहे. देवस्थान समितीतर्फे सध्या समितीच्या अखत्यारीत असलेल्या जमिनींचे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणासाठी आठ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.या बैठकीस देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सचिव विजय पोवार, सदस्य संगीता खाडे, बी. एन. पाटील-मुगळीकर, शिवाजीराव जाधव, सुभाष वोरा उपस्थित होते.

  1. निंबाळकर यांच्या जागेची खरेदी व येथे अन्नछत्र- भक्त निवास उभारणी : १८ कोटी
  2. पॅथॉलॉजी लॅब : १६ कोटी
  3. अंबाबाई मंदिराचा जीर्णोद्धार : ३ कोटी
  4. अंबाबाई मंदिरातील उत्तर बाजूला भाविकांना सोईसुविधांसाठी इमारत बांधणी : ५ कोटी
  5. जोतिबा मंदिर जीर्णोद्धार : १२ कोटी
  6. नरसोबाची वाडी येथे भक्तच निवास : साडेचार कोटी
  7. देवस्थान जमिनींचा सर्व्हे : ८ कोटी

जबाबदारी पुरातत्त्व खात्याचीप्राचीन मंदिरांच्या जतन-संवर्धनाचे काम खरे तर पुरातत्त्व खात्याच्या वतीने केले जाते. मात्र शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे अद्याप अंबाबाई मंदिराचा समावेश राज्य संरक्षित स्मारकामध्ये झालेला नाही. त्यामुळे देवस्थान समितीच अंबाबाई मंदिराचा जीर्णोद्धार करणार आहे. 

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर